तीन तिघाडा...! पत्नींमुळे सैनिकाने नोकरीचा राजीनामा दिला; कमांडरने तिढा सोडविला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:34 PM2021-11-26T16:34:13+5:302021-11-26T16:35:18+5:30

राजीनामा दिलेल्या इराकी सैनिकाच्या तीन पत्नी आहेत. यावर कमांडरने तो राजीनामा न स्वीकारता जबरदस्त तोडगा काढला.

Iraq soldier resigned because of his three wife's; commander solved the problem in one trick | तीन तिघाडा...! पत्नींमुळे सैनिकाने नोकरीचा राजीनामा दिला; कमांडरने तिढा सोडविला

तीन तिघाडा...! पत्नींमुळे सैनिकाने नोकरीचा राजीनामा दिला; कमांडरने तिढा सोडविला

googlenewsNext

सीमेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आणि मागे ठेवलेल्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी आणि मुलांची चिंता या दोन्ही गोष्टी जवळपास प्रत्येक सैनिकाच्या आयुष्याचा भाग असतात. इराकमध्ये अशाच परिस्थितीतून जात असलेल्या एका सैनिकाने नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, नोकरी सोडण्याचे कारण खूपच विचित्र होते, यामुळेच त्याचा हा राजीनामा चर्चेत आला आहे.

राजीनामा दिलेल्या इराकी सैनिकाच्या तीन पत्नी आहेत. स्थानिक न्यूज पोर्टल नॅस न्यूजनुसार, पत्नींनी तक्रार केली की सैन्यात त्यांच्या पतीला खूप कमी सुट्ट्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत राहायला वेळ मिळत नाही. या कारणास्तव सैनिकाने राजीनामा दिला.

यावर कमांडरने तो राजीनामा न स्वीकारता जबरदस्त तोडगा काढला. कमांडरने त्या सैनिकाला 12 दिवसांच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. हे 12 दिवस त्याने तीन भागात विभागून असे प्रत्येक पत्नीबरोबर 4 दिवस रहावे, असा सल्ला कमांडरने त्याला दिला आहे. यानंतर सैनिकानेही विचार बदलला आणि राजीनामा मागे घेतला आहे. 

इराकमधील या सैनिकाची पोस्टिंग कुठे होती, तो कोण आहे याचा उल्लेख बातमीत कुठेही करण्यात आलेला नाही. इराकमध्ये गेल्या महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे सुरक्षा दलांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. प्रो इराण गटाचे समर्थक देशात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करत आहेत, त्यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Iraq soldier resigned because of his three wife's; commander solved the problem in one trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.