अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात साधारणपणे गेल्या एक महिन्यापासून युद्ध सुरू आहे. कुणीही मागे हटण्यास तयार नाही. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एका मुलाखतीत अत्यंत खळबळजनक दावा केला. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हे समलिंगी अथवा 'गे' असल्याची माहिती आपल्याला केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरेतर, एका मुलाखतीदरम्यान, CIA ने आपल्याला नवे अयातुल्ला समलैंगिक असल्यासंदर्भात सांगितले? असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले, "हो, त्यांनी तसे सांगितले होते. पण केवळ त्यांनीच सांगितले का? यासंदर्भात आपल्याला माहिती नाही." ट्रम्प फॉक्स न्यूजशी बोलत होते.
पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, "अनेक लोक असे बोलत आहेत. इराणमधील कडक कायदे पाहता, सर्वोच्च नेत्यासाठी ही एक 'वाईट सुरुवात' आहे." मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही.
दरम्यान, इराणमध्ये समलिंगी संबंध पूर्णपणे बेकायदेशीर असून तेथे शरिया कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद आहे. 'न्यूयार्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात जेव्हा गुप्तचर यंत्रणांनी ट्रम्प यांना मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल ही माहिती दिली, तेव्हा ते प्रचंड थक्क झाले होते. ही माहिती ऐकून आश्चर्य व्यक्त करत ते हसले, असे संबंधित सूत्रांनी म्हटले आहे.
"युद्ध अमेरिकेने जिंकले" - याच मुलाखतीत ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य करताना मोठा दावा केला. ते म्हणाले, अमेरिकेने लष्करीदृष्ट्या इराणविरुद्धचे युद्ध आधीच जिंकले आहे. आमच्या आणि इस्रायली हल्ल्यांनी तेहरानची लष्करी क्षमता जवळपास संपुष्टात आणली आहे. आम्ही पूर्णपणे युद्ध जिंकले असून इराणच्या लष्करी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उद्धवस्त करण्यात आल्या आहेत." दरम्यान, इराणचे नौदल आणि हवाई दलही पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच, इराणची क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र लाँचर्स देखील नष्ट झाली असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Web Summary : Trump alleged Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei is gay, citing CIA intel. He claimed the US has already 'won' militarily against Iran, devastating its military capabilities and infrastructure. Iran's laws harshly punish homosexuality.
Web Summary : ट्रम्प ने CIA के हवाले से दावा किया कि ईरान के सर्वोच्च नेता मोजतबा खामेनेई समलैंगिक हैं। उन्होंने कहा कि अमेरिका ने ईरान के खिलाफ सैन्य रूप से 'पहले ही जीत' हासिल कर ली है, जिससे उसकी सैन्य क्षमता और बुनियादी ढांचे को भारी नुकसान हुआ है। ईरान के कानून समलैंगिकता को कठोर दंड देते हैं।