इराणच्या 'डान्सिंग मिसाइल'नं उडवली इस्रायलची झोप, अशी आहेत 'खासियत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:54 IST2026-03-17T09:53:38+5:302026-03-17T09:54:20+5:30
क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखातातील सर्व देश, इस्रायल, युरोपचा काही भाग येतो.

इराणच्या 'डान्सिंग मिसाइल'नं उडवली इस्रायलची झोप, अशी आहेत 'खासियत'
इराणने रविवारी इस्रायलच्या लष्करी ठिकाणांवर अत्याधुनिक प्रगत ‘सेजील’ क्षेपणास्त्र डागले. १७ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात या क्षेपणास्त्राचा हा पहिलाच वापर मानला जात आहे. क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखातातील सर्व देश, इस्रायल, युरोपचा काही भाग येतो.
‘सेजील’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये... -
- सेजील-२ हे इराणने स्वदेशी विकसित केलेले दोन टप्प्यांचे, घन इंधनावर चालणारे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
- अंदाजे २,००० किमी पल्ला आणि सुमारे ७०० किलो वजनाचे स्फोटक वाहून नेण्याची याची क्षमता आहे.
- क्षेपणास्त्राची लांबी अंदाजे १८ मीटर, व्यास १.२५ मीटर, एकूण वजन सुमारे २३,६०० किलो.
- घन इंधनामुळे द्रव इंधनावर चालणाऱ्या जुन्या ‘शाहआब’ क्षेपणास्त्रांपेक्षा हे अधिक वेगाने तैनात व प्रक्षेपित करता येते.
- या क्षेपणास्त्राला ‘डान्सिंग मिसाइल’ असेही टोपणनाव आहे. अतिशय उंचीवर दिशा बदलण्याच्या क्षमतेमुळे ते क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली, जसे की आर्यन डोम चुकवू शकते.
- या क्षेपणास्त्राच्या विकासावर १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला काम सुरू झाले.
६ चाचण्या घेतल्या -
२००८ : पहिली चाचणी; सुमारे ८०० किमी प्रवास
मे २००९ : सुधारित मार्गदर्शन प्रणाली तपासण्यासाठी दुसरी चाचणी
सहाव्या चाचणीत सुमारे १,९०० किमी अंतर पार करून हिंद महासागरात पोहोचल्याचे सांगितले जाते.