इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:58 IST2026-04-11T15:57:20+5:302026-04-11T15:58:22+5:30

अमेरिकेने इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास संमती दिली आहे. पाकिस्तानमधील शांतता चर्चेत मिळालेल्या या यशामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

Iran's assets will be freed! America's big decision; Will the Strait of Hormuz be reopened? | इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?

इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अत्यंत संवेदनशील चर्चेतून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. इराणने चर्चेसाठी ठेवलेली एक प्रमुख अट अमेरिकेने मान्य केली असून, कतार आणि इतर बँकांमध्ये अडकलेली इराणची कोट्यवधींची मालमत्ता मुक्त करण्यास वॉशिंग्टनने संमती दर्शवली आहे. न्यूज एजन्सी 'रॉयटर्स'ने इराणी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून, यामुळे महिनाभर चाललेल्या युद्धाला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

मालमत्ता मुक्त होणार, निर्बंध हटणार?

इराणने चर्चेपूर्वी स्पष्ट केले होते की, जोपर्यंत त्यांच्यावर लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल होत नाहीत आणि गोठवलेली मालमत्ता परत मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. अमेरिकेने या मागणीला तत्वतः मान्यता दिल्याने इस्लामाबादमधील चर्चेत मोठी प्रगती झाल्याचे मानले जात आहे. जर इराणवरील निर्बंध हटवले गेले, तर जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

१९७९ नंतरची सर्वात मोठी उच्चस्तरीय चर्चा

१९७९च्या इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराणमध्ये प्रथमच इतक्या उच्च पातळीवर थेट संवाद होत आहे. अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर करत आहेत. तर इराणच्या बाजूने संसदेचे सभापती मोहम्मद बाकिर कालिबफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची मैदानात आहेत. २०१५ च्या अणुकरारानंतर ही दोन्ही राष्ट्रे पहिल्यांदाच समोरासमोर बसून चर्चा करण्याची शक्यता आहे.

लेबनॉनच्या मुद्द्यावर अद्यापही पेच

मालमत्तेच्या मुद्द्यावर सहमती झाली असली, तरी लेबनॉनमधील युद्धाचा मुद्दा अद्यापही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराणने लेबनॉनमध्ये तत्काळ युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलचे म्हणणे आहे की, लेबनॉनमधील कारवाई हा इराण-अमेरिका युद्धविरामाचा भाग असू शकत नाही. इराणचे शिष्टमंडळ आज दुपारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेऊन चर्चेची पुढील दिशा निश्चित करणार आहे.

पाकिस्तानची फिल्डिंग यशस्वी होणार?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे स्वागत केले. पाकिस्तान या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. अमेरिकेच्या प्रतिसादावर आता इराण काय भूमिका घेते आणि थेट चर्चेला कधी सुरुवात होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.

Web Title : ईरान की संपत्ति होगी मुक्त! अमेरिकी निर्णय; क्या होर्मुज जलडमरूमध्य खुलेगा?

Web Summary : अमेरिका ईरान की जमी हुई संपत्ति जारी करने पर सहमत, तनाव कम होने की संभावना है। इस्लामाबाद में उच्च स्तरीय वार्ता 1979 की क्रांति के बाद प्रगति दिखाती है। लेबनान एक प्रमुख मुद्दा बना हुआ है। पाकिस्तान मध्यस्थता कर रहा है, जिसका उद्देश्य पश्चिम एशियाई तनाव को कम करना है।

Web Title : Iran's Assets to be Released! US Decision; Hormuz Strait to Open?

Web Summary : US agrees to release Iran's frozen assets, potentially easing tensions. High-level talks in Islamabad show progress after the 1979 revolution. Lebanon remains a key sticking point. Pakistan mediates, aiming to de-escalate West Asian tensions.