चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:43 IST2026-03-10T08:42:59+5:302026-03-10T08:43:23+5:30

Iran Ships leave China with Warfare: चीनमधून निघालेली इराणची जहाजे 'शब्दीस' आणि 'बर्जिन' मलक्का सामुद्रधुनीजवळ पोहोचली. ६,००० किमीचा प्रवास आणि अमेरिकन नेव्हीचा धोका. वाचा सागरी युद्धाचे ताजे अपडेट.

Iranian ships Shabdis and Berzin location loaded with chemicals leave Chinese port; Suspected of supplying rocket fuel, will the US allow them to arrive? | चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

मध्य आशियातील वाढत्या तणावादरम्यान एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनच्या एका प्रमुख बंदरातून इराणची काही मालवाहू जहाजे रवाना झाली असून, त्यामध्ये लष्करी वापरासाठीची घातक रसायने आणि रॉकेट इंधन असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे इराण-इस्रायल युद्धाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या जहाजांमध्ये अशा रसायनांचा साठा आहे जो क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. इराणवर पाश्चात्य देशांनी अनेक निर्बंध लादलेले असताना, चीन उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने इराणला लष्करी मदत करत असल्याचे यातून दिसून येत आहे. हे रॉकेट इंधन इराणच्या 'बॅलिस्टिक मिसाईल' कार्यक्रमासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इस्रायलवरील धोक्यात वाढ झाली आहे. या घडामोडींमुळे अमेरिका आणि युरोपीय देशांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, जागतिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.

४ मार्च रोजी हिंदी महासागरात अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची बलाढ्य युद्धनौका 'IRIS Dena' हिला टार्गेट करून समुद्रात बुडविल्याने इराणच्या जहाजांनी वेगवेगळे मार्ग पकडले आहेत. ही युद्धनौका प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ३ हजार किलोमीटर लांब असतानाही अमेरिकेने Mk-48 टॉरपिडोचा वापर करून तिला उद्ध्वस्त केले. अशातच चीनमधून इराणकडे निघालेली 'शब्दीस' आणि 'बर्जिन' ही दोन जहाजे सध्या अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. या जहाजांमध्ये रॉकेट इंधन आणि लष्करी रसायने असल्याचा संशय असल्याने अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मार्गात बदल आणि एस्कॉर्ट
अमेरिकेच्या धास्तीने इराणची 'हमुना', 'अबियान' आणि 'अर्जिन' ही तीन जहाजे आपला नियमित मार्ग सोडून खुल्या समुद्रातून प्रवास करत आहेत. हे दोन महत्वाचे जहाज सुरक्षित नेण्यासाठी इराणची IRGC नेव्ही त्यांना संरक्षण देण्याची शक्यता आहे. चीनमधून निघालेले बर्जिन हे जहाज सध्या मलेशियाच्या किनाऱ्याजवळ नांगर टाकून उभे आहे. इथून इराणचे अब्बास बंदर सुमारे ६,४०० किमी अंतरावर आहे. हे जहाज पुढील प्रवासासाठी अनुकूल संधीची वाट पाहत असल्याचे समजते. तर शब्दीस' हे जहाज व्हिएतनामच्या समुद्री सीमा ओलांडून पुढे सरकत आहे. या जहाजाला सुमारे ७,२०० किमीचा प्रवास करून इराणच्या चाबहार बंदरात पोहोचायचे आहे.

भारतासाठी चिंता का?
मलक्का सामुद्रधुनी हा जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्ग आहे. इथूनच अंदमान समुद्रात प्रवेश होतो. अमेरिकेने यापूर्वीच इराणची एक युद्धनौका हिंदी महासागरात बुडवली असल्याने, या दोन जहाजांवर हल्ला झाल्यास भारतीय सागरी क्षेत्रातील व्यापारी वाहतुकीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Web Title : चीन से युद्ध रसायन ले जा रहे ईरानी जहाज: क्या अमेरिका करेगा हस्तक्षेप?

Web Summary : चीन से रॉकेट ईंधन और युद्ध रसायन ले जाने के संदेह में ईरानी जहाज अमेरिकी निगरानी में हैं। अमेरिकी नौसेना ने पहले एक ईरानी युद्धपोत को निशाना बनाया था। भारत को डर है कि संघर्ष बढ़ने पर समुद्री व्यापार मार्गों में व्यवधान हो सकता है।

Web Title : Iran Ships Carrying War Chemicals from China: US Intervention?

Web Summary : Iranian ships, suspected of carrying rocket fuel and war chemicals from China, are under US scrutiny amid rising tensions. The US Navy previously targeted an Iranian warship. India worries about potential disruption to maritime trade routes if conflict escalates.