VIDEO: इराणच्या हल्ल्यानंतर दोहामध्ये दहशत; सायरन वाजताच मॉलमध्ये पळत सुटल्या महिला आणि मुलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:33 IST2025-06-24T11:26:27+5:302025-06-24T11:33:10+5:30
अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने कतारवर मोठा हल्ला केला.

VIDEO: इराणच्या हल्ल्यानंतर दोहामध्ये दहशत; सायरन वाजताच मॉलमध्ये पळत सुटल्या महिला आणि मुलं
Iranian Missile Attacks on Qatar: अमेरिकेने तीन अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. इराणने करारच्या दोहा येथील अमेरिकन हवाई तळावर हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर दोहा शहरात खळबळ उडाली होती. कतारची राजधानी दोहा शहर सोमवारी रात्री स्फोटांच्या आवाजाने हादरले. इराणच्या हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात सायरन वाजू लागले होते. यावेळी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालं. इराणच्या हल्ल्यानंतर दोहामधील एका मॉलमध्ये गोंधळ उडाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने अमेरिकेला लक्ष्य केले. इराणने कतारची राजधानी दोहा येथील अल उदेद हवाई तळावर लहान आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० पैकी ९ क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कतारने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यांमुळे दोहामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर कतारच्या नागरिकांना भयानक हवाई हल्ला अनुभवायला मिळाला. रात्री इराणने कतारमधील अल-उदेद एअरबेसला लक्ष्य केले. या हल्ल्याचा कतारमधील लोकांना त्यांच्या देशात अशा हवाई हल्ल्यांचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराण हल्ल्यांदरम्यान दोहामधील एका मॉलचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये लोक लोक मॉलमधून बाहेर पळताना दिसत आहेत. यामध्ये मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. मॉलमधले लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. ते कसं तरी मॉलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. सायरन ऐकताच लोक ओरडत धावू लागले.
See the visual of Qatar Mall people on panic mode !
— Ashish Singh (@AshishSinghKiJi) June 23, 2025
Iran missile launch against US in
Al Udeid Air Base.
It's very very big Attack by IRANIANS #Iran#Qatar, #USA#Iraq.
#Kuwait, #Bahrain, (#UAE)#ww3#Ww3Beginspic.twitter.com/kWyouY8xCH
सोमवारी रात्री उशिरा दोहामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण शहरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आणि सायरनचे आवाज येऊ लागला. हल्ल्यानंतर लगेचच कतार, कुवेत, बहरीन आणि युएईने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण प्रदेशात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर टाकलेल्या बॉम्बइतकीच क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या तळावर टाकण्यात आली असं इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटलं.