महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलनासमोर इराण सरकार झुकले; तो मोठा निर्णय केला रद्द...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 19:17 IST2022-12-04T19:16:29+5:302022-12-04T19:17:22+5:30
देशभरात सुरू असलेल्या महिलांच्या प्रदर्शनादरम्यान इराण सरकारने Morality police बरखास्त केले आहे.

महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलनासमोर इराण सरकार झुकले; तो मोठा निर्णय केला रद्द...
तेहरान: महसा अमिनी नावाच्या तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबविरोधी निदर्शने होत आहेत. देशभरात महिलांचा विरोध पाहता इराण सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. इराण देशातील नैतिकता पोलिस (Morality police) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांनी रविवारी ही माहिती दिली.
तेहरानमधील नैतिकता पोलिसांनी अटक केल्यानंतर 22 वर्षीय महसा अमिनीचा कोठडीत मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण इराणमध्ये हिजाबविरोधात निदर्शने पाहायला मिळाली. कठोर ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसाला अटक करण्यात आली होती. वृत्तसंस्था ISNA ने अॅटर्नी जनरल मोहम्मद जफर मोंटझारी यांच्या हवाल्याने म्हटले की, "नैतिकता पोलिसांचा न्यायव्यवस्थेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना बरखास्त करण्यात आले आहे."
इराणमध्ये महसा अमिनीच्या कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर इराणमध्ये 16 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान 14,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. इराणमधील अनेक कार्यकर्ते आणि तज्ञांनी या आंदोलनाला राष्ट्रीय क्रांती म्हणून संबोधले आणि इराण सरकारसाठी हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे वर्णन केले.