‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 08:58 IST2026-04-07T08:56:48+5:302026-04-07T08:58:30+5:30

Iran War News: इराणमध्ये अमेरिकन सैनिकाच्या सुटकेसाठी अमेरिकन सैन्यदलाने राबवलेल्या बचाव मोहिमेच्या एका पेक्षा एक सुरस कहाण्या आता समोर येत आहेत. त्यात आता खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भूमीवर अडकलेल्या त्या सैनिकाने कशाप्रकारे शौर्य दाखवत स्वत:चा बचाव केला याची थरारक माहिती दिली आहे.  

Iran War Update: 'There was a lot of blood flowing, but he...' Donald Trump tells the story of the bravery of 'that' soldier trapped in Iran | ‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  

‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  

आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. या संघर्षादरम्यान, अमेरिकेचं ए-१५ हे लढाऊ विमान इराणने पाडलं होतं. मात्र या विमानातील एक वैमानिक आणि एक वेपन सिस्टिम ऑफिसर बचावले होते. त्यापैकी वैमानिकाची अमेरिकन सैन्याने तातडीने सुटका केली होती. तर दुसऱ्या अमेरिकन सैनिकाच्या सुटकेसाठी अमेरिकन सैन्यदलाने राबवलेल्या बचाव मोहिमेच्या एका पेक्षा एक सुरस कहाण्या आता समोर येत आहेत. त्यात आता खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भूमीवर अडकलेल्या त्या सैनिकाने कशाप्रकारे शौर्य दाखवत स्वत:चा बचाव केला याची थरारक माहिती दिली आहे.

गुरुवारी रात्री इराणमध्ये हल्ले करत असताना अमेरिकेचे एफ-१५ हे लढाऊ विमान इराणमध्ये कोसळले होते. मात्र हे विमान कोसळत असताना त्यातील वैमानिक आणि वेपन सिस्टिम ऑफिसर हे सुखरूपपणे इजेक्ट करण्यात यशस्वी ठरले होते. मात्र वेग जास्त असल्याने ते एकमेकांपासून खूप लांब अंतरावर उतरले होते. यातील वैमानिकाला अमेरिकन सैन्याने तातडीने वाचवले. मात्र वेपन सिस्टिम ऑपरेटर इराणच्या भूमीवर अडकला होता.

हा वेपन सिस्टिम ऑपरेटर गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या आजूबाजूच्या भागात इराणचे सैनिक, रिवोल्युशनरी गार्ड शोध घेत होतो. अशा परिस्थितीत या अधिकाऱ्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्नन सुरू केले. शत्रू आपल्या जवळ पोहोचू नयेत, यासाठी हा अधिकारी जखमी असूनही डोंगराळ प्रदेशात वरच्या दिशेने चढाई करत राहिला. 
यादरम्यान, त्याच्या शरीरातून भळाभळा रक्त वाहत होतं. मात्र तो कड्याकपारीतून वर चढत राहिला. त्याने स्वत:ला झालेल्या जखमांवर मलमपट्टी केली आणि त्याच्याजवळ असलेल्या विशेष लोकेशन ट्रान्समीटर डिव्हाईसच्या मदतीने अमेरिकन सैन्याला आपल्या जागेची माहिती देण्यास सुरुवात केली. सुमारे ४८ तास तो शत्रूच्या भूमीवर लपून स्वत:चा बाचव करण्यात यशस्वी ठरला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या  मोहिमेबाबत आणखी माहिती देताना सांगितले की, अमेरिकन सैन्याचं एक तत्त्व आहे, आम्ही आपल्या कुठल्याही सैनिकाला मागे सोडत नाही. मागच्या ३७ दिवसांमध्ये आमेरिकेने इराणवरून १० हजारांहून अधिक उड्डाणे केली आहेत. तसेच सुमारे १३ हजारांहून अधिक ठिकाणी हल्ले केले आहेत. एवढ्या मोठ्या मोहिमेमध्ये पहिल्यांदाच एखादं अमेरिकन विमान कोसळलं. मात्र दोन्ही सैनिकांना सुरक्षितपणे परत आणलं गेलं. ही बचाव मोहीम लष्करी इतिहासातील सर्वात मोठी आणि धोकादायक बचाव मोहिमांपैकी एक आहे. ती कायम स्मरणात राहील, असेही ट्रम्प यांनी सांगितले. 

Web Title : ट्रम्प ने ईरान में फंसे अमेरिकी सैनिक की बहादुरी की कहानी बताई।

Web Summary : ईरान में अमेरिकी जेट दुर्घटनाग्रस्त होने के बाद, एक घायल सैनिक 48 घंटे तक पकड़ा नहीं गया, और अमेरिकी बलों को सतर्क कर दिया। ट्रम्प ने साहसी बचाव की सराहना की।

Web Title : Trump recounts bravery of US soldier stranded in Iran after crash.

Web Summary : After a US jet crashed in Iran, a wounded soldier evaded capture for 48 hours, alerting US forces. Trump hailed the daring rescue.