गरजेवेळी हवे तेवढे कच्चे तेल ओरबाडले, आता दगा दिला! पाकिस्तानने इराणविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत केले मतदान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:59 IST2026-03-12T08:58:32+5:302026-03-12T08:59:30+5:30

Iran War News, Pakistan : UNSC चा ईराणवर मोठा निर्णय! पाकिस्ताननेही केली कोंडी; आखाती देशांवरील हल्ले थांबवण्याचे आदेश

Iran War News, Pakistan : When it was needed, it extracted as much crude oil as it wanted, now it has betrayed it! Pakistan voted against Iran in the United Nations. | गरजेवेळी हवे तेवढे कच्चे तेल ओरबाडले, आता दगा दिला! पाकिस्तानने इराणविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत केले मतदान  

गरजेवेळी हवे तेवढे कच्चे तेल ओरबाडले, आता दगा दिला! पाकिस्तानने इराणविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत केले मतदान  

मध्य पूर्वेतील युद्ध दिवसेंदिवस भीषण होत असताना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने इराणविरुद्ध एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. बहारिनने मांडलेल्या या ठरावात इराणने आखाती देशांवर केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, इराणचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या पाकिस्ताननेही या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने जागतिक स्तरावर चर्चा रंगली आहे.

सुरक्षा परिषदेने बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने या ठरावाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, या युद्धामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दोन पाकिस्तानी नागरिकांचा आधीच मृत्यू झाल्याने पाकिस्तानने 'स्वसंरक्षणा'साठी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

मतदान प्रक्रिया
१५ सदस्यीय परिषदेत १३ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर रशिया आणि चीन तटस्थ राहिले. कोणताही देश या ठरावाच्या विरोधात गेला नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यात आणला जाणारा अडथळा त्वरित थांबवण्याची तंबी इराणला देण्यात आली आहे.

इराणचे प्रत्युत्तर
इराणने या ठरावाचा निषेध केला असून, हा सुरक्षा परिषदेचा 'उघड गैरवापर' असल्याचे म्हटले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्याकडे जग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इराणने केला आहे.

Web Title : पाकिस्तान ने ईरान को दिया धोखा, संयुक्त राष्ट्र में खिलाफ किया मतदान

Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच, पाकिस्तान ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद में ईरान के खिलाफ मतदान किया। खाड़ी देशों पर हमलों की निंदा करते हुए, पाकिस्तान ने क्षेत्र में पाकिस्तानी नागरिकों की सुरक्षा और हाल की मौतों का हवाला दिया, जबकि ईरान के साथ उसके पारंपरिक रूप से घनिष्ठ संबंध हैं।

Web Title : Pakistan Betrays Iran, Votes Against It in UN Amidst Tensions

Web Summary : Amidst rising Middle East tensions, Pakistan voted against Iran in the UN Security Council resolution condemning attacks on Gulf nations. Citing the safety of Pakistani citizens in the region and recent fatalities, Pakistan supported the resolution despite its traditionally close ties with Iran.