मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:50 IST2026-04-07T10:48:19+5:302026-04-07T10:50:10+5:30

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलने २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते आणि लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. दरम्यान, अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आलेले खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याबाबतही आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Iran War: Mojtaba Khamenei in a coma, no information about the war, no..., did America and Israel even know his whereabouts? | मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?

मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?

अमेरिका आणि इस्राइलने २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते आणि लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. दरम्यान, अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आलेले खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याबाबतही आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इस्राइलच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोजतबा खामेनई हे सध्या कोमामध्ये असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अचेतावस्थेत असलेल्या खामेनेई यांना युद्धाच्या आघाडीवर काय चाललं आहे, याची कुठलीही कल्पना नाही आहे.

मोजतबा खामेनेई यांच्यासंदर्भातील ही धक्कादायक माहिती ब्रिटनमधील द टाइम्स या वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, मोजतबा खामेनेई हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जखमी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अमेरिका आणि इस्राइलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात मोजतबा हेही जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता एका डिप्लोमॅटिक मेमोमधून इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबाबत ही माहिती समोर आली आहे. हा मेमो अमेरिका आमि इस्राइलच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. तसेच तो आखाती देशांनाही पाठवण्यात आला आहे.

याबाबत द टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार मोजतबा खामेनेई हे सध्या कोमामध्ये आहेत. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोजतबा खामेनेई हे सध्या इराणची राजधानी असलेल्या तेहरानपासून सुमारे १४० किमी अंतरावर दक्षिणेकडे असलेल्या कोम शहरामध्ये असून, तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  याआधी त्यांना उपचारांसाठी रशियामध्ये नेण्यात आल्याचे दावे केले जात होते. मात्र मोजतबा हे इराणमध्येच असल्याचे रशियन राजदूताने स्पष्ट केले होते. तसेच आता द टाइम्सच्या वृत्तानेही त्याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इस्राइलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई हे कसे वाचले याचीही माहिती समोर आली आहे. खामेनेई यांच्या निवासस्थानावर हल्ला करताना अमेरिका आणि इस्राइलने मोजतबा यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला झाला तेव्हा ते घरातून बाहेर पडल्याने ते बचावले होते.  

Web Title : खामेनेई के बेटे मोजतबा हमले के बाद कोमा में; युद्ध की जानकारी अज्ञात?

Web Summary : ईरान के सर्वोच्च नेता के बेटे मोजतबा खामेनेई कथित तौर पर हमले के बाद कोमा में हैं। उन्हें युद्ध की स्थिति की जानकारी नहीं है। कहा जा रहा है कि अमेरिका और इजराइल को उनके ठिकाने की खुफिया जानकारी है। उनका इलाज कोम के पास चल रहा है।

Web Title : Khamenei's son Mojtaba in coma after attack; war info unknown?

Web Summary : Mojtaba Khamenei, son of Iran's supreme leader, is reportedly in a coma following an attack. He's unaware of the war situation. The US and Israel are said to have intel on his location. He is being treated near Qom.