शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत खासगी विमानासाठी मोजावे लागताहेत कोट्यवधी रुपये; केवळ श्रीमंतांना प्रवास शक्य, चार्टरचे भाडे २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:28 IST

युद्धामुळे चार्टर्ड फ्लाइट्सची मागणी प्रचंड वाढल्याने काही लोक सुरक्षित बाहेर पडण्यासाठी २ लाख युरो (२.१६ कोटी) रुपये मोजत आहेत.

दुबई : इराणयुद्धाची झळ आखाती देशांपर्यंत पोहोचल्याने हजारो प्रवासी दुबई, अबूधाबी व दोहा येथे अडकले आहेत. मात्र, काही श्रीमंत प्रवासी इराणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून सुरक्षित असलेल्या विमानतळांवरून युरोपला जाणाऱ्या खासगी, लक्झरी फ्लाइटसाठी कोट्यवधी रुपये मोजत आहेत. 

युद्धामुळे चार्टर्ड फ्लाइट्सची मागणी प्रचंड वाढल्याने काही लोक सुरक्षित बाहेर पडण्यासाठी २ लाख युरो (२.१६ कोटी) रुपये मोजत आहेत. तर अत्यंत सुरक्षित ठिकाण असलेल्या दुबईत अडकलेल्या शेकडो लोकांनी रस्ते मार्गाने प्रवास सुरू केला आहे. दुबईतील काही प्रवासी मस्कतला जात आहेत. 

अपडेट सतत तपासा, तज्ज्ञांचा सल्ला  युद्धासारख्या गंभीर परिस्थितीत दूतावासाच्या सूचना, सुरक्षेसंदर्भातील इशारे, विमानतळ-एअरलाईन्सचे अपडेट्स सतत तपासण्याचा सल्ला आखातात अडकलेल्या प्रवाशांना तज्ज्ञांनी दिला आहे. शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळा, रिफंड व विमा अटी काळजीपूर्वक वाचा, पर्यायी मार्ग आणि तारखा विचारात घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

युद्ध भडकल्यानंतर मागणी वाढल्याने झाली दरवाढ  युद्ध भडकल्यानंतर खासगी विमानांची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. १६ प्रवासी क्षमतेच्या खासगी विमानाचे रियाध ते पोर्तुगालचे भाडे सरासरी १ लाख युरो (१.०७ कोटी) होते. मात्र, त्यात आता दुप्पट वाढ झाली आहे.  आखाती देशांमधून युरोपकडे जाणाऱ्या खासगी विमानाचे भाडे १.५ ते २ लाख युरो (२.१६ कोटी) दरम्यान झाले आहेत. विमानांची टंचाई, जोखीम मूल्यांकन व मार्गातील अडथळे यामुळे भाड्यात मोठी वाढ झाली आहे. 

प्रवाशांना सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई सेवा कोलमडली असून, अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. इराण, इस्रायलसह कतार, बहरीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, सौदी अरेबिया, सीरिया, यूएई व येमेन येथून शक्य तितक्या लवकर खासगी विमानाने बाहेर पडण्याचे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. चीन, इटली, फ्रान्स व जर्मनीनेही आपल्या नागरिकांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai Private Jet Costs Soar Amidst Iran War Tensions

Web Summary : Amidst Iran war tensions, private jet demand in Dubai surges. The wealthy pay millions to escape. Chartered flights now cost over ₹2 crore. Many stranded travelers seek alternative routes.
टॅग्स :DubaiदुबईIranइराणwarयुद्धIsraelइस्रायल