इराणने सौदी अरेबियात भेदला अमेरिकन किल्ला; ड्रोन हल्ल्यात CIA स्टेशन उडवण्यात मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:05 IST2026-03-04T10:03:07+5:302026-03-04T10:05:42+5:30

इराणकडून सातत्याने इस्रायलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सहकारी देशांवर हल्ले केले जात आहेत.

Iran vs US-Isreal War: Iranian drone attack hit the CIA's station at the U.S. Embassy in Saudi Arabia | इराणने सौदी अरेबियात भेदला अमेरिकन किल्ला; ड्रोन हल्ल्यात CIA स्टेशन उडवण्यात मोठं यश

इराणने सौदी अरेबियात भेदला अमेरिकन किल्ला; ड्रोन हल्ल्यात CIA स्टेशन उडवण्यात मोठं यश

रियाध - अमेरिकाइस्रायल यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणला मोठं यश मिळाले आहे. इराणने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात सौदी अरेबिया येथील अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे CIA स्टेशन उद्ध्वस्त झाले आहे. CIA स्टेशन रियाध येथील अमेरिकन दूतावासात होते. सोमवारी या स्टेशनवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा इराणमध्ये विद्रोह भडकवण्यासाठी कुर्दिश सैनिकांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी योजना आखत होते. या हल्ल्याच्या दोनच दिवसांपूर्वी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात मारले गेले. इराणमधील या हल्ल्याचे ठिकाण सीआयएने पुरवले होते.

वॉश्गिंटन पोस्टने त्यांच्या रिपोर्टमध्ये परराष्ट्र विभागाचा अंतर्गत अलर्टचा उल्लेख केला आहे. त्यातून इराणच्या ड्रोन हल्ल्यात CIA स्टेशनचा एक भाग कोसळला आणि परिसरात धूर पसरल्याचे समोर आले. स्टेशनलाही संरचनात्मक नुकसान झाले आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाने दूतावासाच्या संकुलावर दोन ड्रोन हल्ला झाल्याची पुष्टी केली होती परंतु सीआयए स्टेशनवर परिणाम झाला की नाही हे सांगितले नव्हते. शनिवारी इस्रायल आणि अमेरिका यांच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर इराणने बदला घेण्याचा निर्णय घेतला. 

इराणकडून सातत्याने इस्रायलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सहकारी देशांवर हल्ले केले जात आहेत. मंगळवारीही दुबईत ड्रोन हल्ल्याने अमेरिकन दूतावास कार्यालयाला टार्गेट केले. या हल्ल्यानंतर तिथे मोठी आग लागली. त्यापूर्वी कुवेतमध्येही अमेरिकन सैन्य तळावर हल्ला केला तिथे ६ सैनिक मारले गेले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीच्या स्ट्राईकमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले. परंतु इराणने ज्यारितीने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला. त्याशिवाय अमेरिकाही चांगलीच संतापली आहे. इराण शेजारील देशांवर हल्ले करेल अशी अपेक्षा अमेरिकेला नव्हती हे ट्रम्प यांनीही कबूल केले. 

दरम्यान, अमेरिका इराणवर हल्ला करण्याबाबत कुर्द नेत्यांशी चर्चा करत असताना इराणने हा हल्ला केला आहे. इराणी कुर्दिश मिलिशियाचे हजारो सैन्य इराक-इराण सीमेवर तैनात आहे, ज्यांना उत्तर कुर्दिस्तान प्रदेशाचा पाठिंबा आहे. ट्रम्प प्रशासन आता या मार्गाने शस्त्रे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सद्दाम हुसेनच्या पतनापासून हा परिसर स्थानिक कुर्दिश गटांसाठी आश्रयस्थान आहे. शनिवारी युद्ध सुरू झाल्यापासून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या भागात ड्रोन हल्ल्यांनी या गटांना लक्ष्य केले आहे.

Web Title : ईरान ने सऊदी अरब में अमेरिकी सीआईए स्टेशन पर ड्रोन से हमला किया।

Web Summary : ईरान ने रियाद में एक सीआईए स्टेशन पर ड्रोन हमला कर अमेरिका/इजरायल के हमलों का बदला लिया। स्टेशन पर कुर्द विद्रोहियों की मदद करने का आरोप था। इससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया है।

Web Title : Iran strikes US CIA station in Saudi Arabia with drones.

Web Summary : Iran retaliated against US/Israeli attacks by hitting a CIA station in Riyadh with a drone strike. The station was allegedly aiding Kurdish rebels. This escalates Middle East tensions.