Iran US War Update : मोजतबा खामेनेई कोमात, त्यांचा पाय कापला; इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:23 IST2026-03-13T09:20:35+5:302026-03-13T09:23:21+5:30

Iran US War Update : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल अटकळ बांधली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, खामेनेई यांना गंभीर दुखापत झाली आहे. हवाई हल्ल्यात त्यांचा पाय तुटला आहे आणि ते कोमात आहेत असा दावा करण्यात आला आहे.

Iran US War Update Mojtaba Khamenei in coma, his leg amputated; Donald Trump's sensational claim about Iran's new supreme leader | Iran US War Update : मोजतबा खामेनेई कोमात, त्यांचा पाय कापला; इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Iran US War Update : मोजतबा खामेनेई कोमात, त्यांचा पाय कापला; इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Iran US War Update :  इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत जगभरात चर्चा वाढल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.  मोजतबा खामेनेई अजूनही जिवंत आहेत, परंतु ते गंभीर जखमी असू शकतात, असा दावा त्यांनी केला."मला वाटते की ते कदाचित आहेत. मला वाटते मोजतबा यांना मोठे नुकसान झाले आहे, असंही ट्रम्प म्हणाले. गुरुवारी, खामेनेई यांनी सर्वोच्च नेते झाल्यानंतर त्यांचे पहिले भाषण दिले. 

Iran US War Update : युद्धामुळे सर्वात मोठ्या तेल संकटाचा सामना करावा लागतोय; आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने दिला इशारा

इराणचे नवे सर्वोच्च नेते एक पाय गमावले आहेत, यकृताला दुखापत झाली आहे आणि ते कोमात आहेत, असा दावा केला आहे.

गुरुवारी, मोजतबा खामेनेई यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते झाल्यानंतर त्यांचे पहिले अधिकृत निवेदन जारी केले. हे निवेदन इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रसारित झाले, परंतु स्वतः खामेनेई कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. त्यांचे विधान एका वृत्तवाहिनीने मोठ्याने वाचून दाखवले. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अटकळांना वेग आला आहे. त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात अली खामेनेई यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला.

सरकारी टीव्हीवर वाचलेल्या त्यांच्या पहिल्या संदेशात, ५६ वर्षीय खामेनेई यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध कडक भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, 'इराण शहीदांच्या रक्ताचा' बदला घेईल, असेही म्हटले होते. होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील आणि आखाती देशांनी त्यांच्या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळ त्वरित बंद करावेत. 'जर अमेरिकन लष्करी तळ बंद केले नाहीत तर त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. इराण त्यांच्या वडिलांचे धोरण चालू ठेवेल आणि अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध संघर्ष सुरूच राहील, असेही खामेनेई म्हणाले.

मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत अपडेट

कॅमेऱ्यासमोर खामेनेई येत नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ते  पहिल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात जखमी झाले होते, असा दावा एका वृत्तपत्रात केला होता. खामेनेई यांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे काही माध्यमांनी सांगितले होते. तर सीएनएनने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचा दावा केला होता. 

Web Title : ईरान यूएस युद्ध: मोजतबा खामेनेई कोमा में, ट्रम्प का दावा

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प का दावा है कि ईरान के नए नेता मोजतबा खामेनेई गंभीर रूप से घायल हैं और संभवतः कोमा में हैं। एक कथित अमेरिकी-इजरायली हमले के बाद उनकी हालत बिगड़ी। टीवी पर बयान के बावजूद, खामेनेई की कैमरे से अनुपस्थिति ने अमेरिका और इजरायल के साथ बढ़ते तनाव के बीच उनकी स्थिति पर अटकलों को हवा दी।

Web Title : Iran US War: Mojtaba Khamenei in coma, Trump makes claim

Web Summary : Donald Trump claims Iran's new leader, Mojtaba Khamenei, is seriously injured and possibly in a coma after an alleged US-Israeli attack. Despite a televised statement, Khamenei's absence from the camera fuels speculation about his condition and future leadership amid escalating tensions with the US and Israel.