युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:59 IST2026-04-06T13:58:32+5:302026-04-06T13:59:41+5:30

Iran War News: आयआरजीसीच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. आयआरजीसीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Iran suffers major setback during war, intelligence chief Majid Khademi killed in US-Israeli attack | युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला सव्वा महिना लोटत आला आहे. या सव्वा महिन्याच्या काळात इराणनेअमेरिका आणि इस्राइलच्या आक्रमक कारवाईला इराणकडून जोरदार आव्हान दिले जात आहे. मात्र या भीषण संघर्षात इराणच्या अनेक बड्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता आयआरजीसीच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी हे अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. आयआरजीसीने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आयआरजीसीने खादेमी यांना आदरांजली वाहिली आहे. इराणचं संरक्षण आणि क्रांतीसाठी खादेमी यांनी अनेक दशके सेवा केली. त्यांनी गुप्तचर मोहिमा आणि संरक्षण मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, अशा शब्दात आयआरजीसीने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

दरम्यान, रविवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर एक संदेश प्रसारित करत तेहरानच्या अनेक वरिष्ठ लष्करी नेत्यांना ठार मारण्यात आले आहे, असा दावा केला होता. हा एक मोठा हल्ला होता असे सांगत ट्रम्प यांनी एक सात सेकंदांचा व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. त्यात मोठ्या स्फोटासह आकाश उजळून जाताना दिसत होते. दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात सुरू केलेल्या कारवाईत अमेरिका आणि इस्राइलने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाहा खामेनेई यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना ठार मारले आहे.   
  

Web Title : युद्ध के बीच अमेरिका-इजराइल के हमले में ईरानी खुफिया प्रमुख की मौत

Web Summary : ईरान और अमेरिका-इजराइल के बीच युद्ध में, ईरानी आईआरजीसी खुफिया प्रमुख माजिद खादेमी की मौत हो गई। आईआरजीसी ने उनकी मौत की पुष्टि की और उनकी सेवा की प्रशंसा की। अमेरिकी राष्ट्रपति ट्रम्प ने ईरानी नेताओं को मारने का दावा किया।

Web Title : Iran Intel Chief Killed in US-Israel Attack Amidst Conflict

Web Summary : Amid ongoing conflict, Iran's IRGC intelligence chief, Majid Khademi, was killed in a US-Israel attack. IRGC confirmed his death, praising his service. US President Trump claimed responsibility for killing senior Iranian leaders.