अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:31 IST2026-04-03T12:30:43+5:302026-04-03T12:31:15+5:30

इराणने अमेरिकेचे सर्वात प्रगत F-35 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. १५ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे इराणने म्हटले आहे.

Iran shoots down US F-35 aircraft! Second fighter jet game in 15 days; Excitement on the battlefield | अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ

अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे. इराणच्या लष्कराने मध्य इराणमधील मरकजी प्रांतात अमेरिकेचे सर्वात प्रगत आणि अजेय मानले जाणारे F-35 हे स्टेल्थ फायटर जेट पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अमेरिकेचे दुसरे लढाऊ विमान पाडल्याचा हा इराणचा दावा आहे. या विमानाचे अवशेष मरकजी प्रांतात विखुरलेले असून, इराणने त्याचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे.

ब्रिटीश कनेक्शन आणि मलब्याचा पुरावा

'अल-जजीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने पाडलेल्या या विमानाच्या मलब्याची प्राथमिक तपासणी केली असता, त्यावर ब्रिटनमधील 'लेकनहीथ एअर बेस'चे निशाण आढळले आहे. हा एअरबेस अमेरिकन वायुसेनेसाठी ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाचा तळ मानला जातो. यावरून हे विमान ब्रिटनमधून उड्डाण करून इराणच्या सीमेत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विमानाचा पायलट सुरक्षित आहे की त्याचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

१५ दिवसांत दुसरा मोठा झटका!

यापूर्वी १९ मार्च रोजी देखील इराणने अमेरिकेचे F-35A फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. त्यावेळी एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता, मात्र अमेरिकेने तो दावा फेटाळून लावला होता. अमेरिकेनुसार, त्या विमानाला केवळ किरकोळ इजा झाली होती आणि पायलटने यशस्वी इमर्जन्सी लँडिंग केले होते. मात्र, यावेळेस इराणने थेट विमानाचे तुकडे आणि फोटो जगासमोर ठेवल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे.

अमेरिकेचे आतापर्यंत किती नुकसान?

या युद्धात अमेरिकेने आतापर्यंत आपली १६ ते २० विमाने आणि ड्रोन्स गमावले आहेत. यामध्ये  इराणने आतापर्यंत अमेरिकेचे MQ-9 Reaper ९ ते १२ ड्रोन्स पाडले आहेत. इराणच्या दाव्यानुसार त्यांनी २ F-35 विमाने पाडली आहेत, मात्र अमेरिकेने यातील एक दावा फेटाळला आहे. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टमने चुकून अमेरिकेची ३ 'F-15E Strike Eagle' विमाने पाडली होती, ज्याला 'फ्रेंडली फायर' म्हटले जाते.

इराणचा इशारा आणि अमेरिकेचे मौन

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, विमान कोसळताना झालेला स्फोट इतका भीषण होता की पायलटला इजेक्ट करण्याची संधी मिळणे कठीण होते. अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने अद्याप या ताज्या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इराणने ज्या पद्धतीने पुराव्यासह हा दावा केला आहे, ते पाहता अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Web Title : ईरान का दावा: अमेरिकी F-35 विमान गिराया, तनाव चरम पर।

Web Summary : ईरान ने एक अमेरिकी F-35 लड़ाकू विमान को मार गिराने का दावा किया है, जो 15 दिनों में दूसरा है, और मलबे की तस्वीरें पेश की हैं। मलबे पर एक ब्रिटिश एयरबेस के निशान हैं, जो इसकी उत्पत्ति का सुझाव देते हैं। अमेरिका ने कोई टिप्पणी नहीं की है। इससे पहले, ईरान ने एक और F-35 को मार गिराने का दावा किया था, जिसका अमेरिका ने खंडन किया था।

Web Title : Iran claims downing US F-35; tensions escalate in Middle East.

Web Summary : Iran claims to have shot down a US F-35 fighter jet, the second in 15 days, presenting wreckage photos. The debris shows markings of a British airbase, suggesting its origin. The US has not commented. Earlier, Iran claimed downing another F-35, denied by the US.