शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

इराण हादरलं! बंदरामध्ये भीषण गॅस स्फोट; नौदल प्रमुखाच्या मृत्यू झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:35 IST

Iran Explosion News : इस्रायलने स्फोटातील सहभाग नाकारला. वाचा इराणमधील ताज्या घडामोडी.

इराणचे महत्वाचे बंदर असलेल्या अहवाजमध्ये एकामागोमाग एक असे दोन भीषण स्फोट झाले आहेत. यामध्ये इमारत कोसळली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा हल्ला अमेरिका किंवा इस्रायलने केल्याचे सांगितले जात होते. यामध्ये इराणच्या नौदलाच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतू, इराणने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. 

बंदर परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बंदर अब्बास येथील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये तणावाचे वातावरण असून, इस्रायलने या घटनांमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बचावकार्यात चिमुरड्याला जीवदानअहवाजमधील स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली. स्थानिक अग्निशमन दल आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ढिगाऱ्याखालून एका लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

इराणच्या दक्षिण भागातील बंदर अब्बास बंदराजवळ झालेल्या एका गूढ स्फोटानंतर इस्रायलवर संशयाची सुई होती. मात्र, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली अधिकाऱ्यांनी या स्फोटात आपला कोणताही हात नसल्याचे म्हटले आहे.

आयआरजीसी प्रमुखांच्या मृत्यूच्या अफवाया स्फोटांच्या मालिकेत इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे नौसेना प्रमुख अलीरेझा तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, इराणने या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगत स्पष्ट केले की, नौसेना कमांडर पूर्णपणे सुरक्षित आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Rocked: Gas Explosion at Port, Navy Chief's Death Denied

Web Summary : Massive gas explosions in Ahvaz, Iran, caused building collapse and fatalities. Initial suspicions of US/Israel involvement and the Navy Chief's death were refuted. Gas leak triggered the blast, burying many. Israel denied involvement amidst rising tensions. A child was rescued from the rubble.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल