शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 06:22 IST

iran strikes us air base Update: इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. इराणने अमेरिकेच्या कतार येथील लष्करी तळांवर १० मिसाईल डागले.

दुबई : अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर हल्ला केलेल्या ३६ तास उलटत नाहीत तोच इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. इराणने अमेरिकेच्या कतार येथील लष्करी तळांवर १० मिसाईल डागले. रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यातील १० पैकी ९ मिसाईल जमिनीवर पडण्याआधीच नष्ट केल्याचा दावा कतारने केला आहे.

इस्रायलने इराणच्या सरकारी इमारती, कुप्रसिद्ध एविन कारागृह आणि रेव्होल्युशनरी गाईसचे मुख्यालय यावर सोमवारी जोरदार हल्ले केले. 

इराणने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. तसेच तेहरानजवळच्या फोडों अणुकेंद्रामध्ये कोणालाही जाता येऊ नये, या हेतूने इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे त्या केंद्राभोवतालच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेनेही रविवारी या अणुकेंद्रावर मारा केला होता. 

इराणमधील ६ तळांवर हल्ल्याचा इस्रायलचा दावा

इराणमधील तेहरान, नतांझ, फोर्डो, तबरीज, इस्फहान, सिराज या सहा सैनिकी, अणुतळ व विमानतळांवर हवाई हल्ले केल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या हल्ल्यात इराणच्या हवाई दलाच्या ताफ्यातील एफ-१४, एफ-५, एएच-१ या प्रकारची विमाने तसेच विमानतळांकडे जाणारे रस्ते, धावपट्टीची हानी झाली.

कुठे, किती नुकसान?

इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये जीवितहानीबाबत अधिकृत माहिती लगेच उपलब्ध झाली नसली तरी किमान २४ लोकांचा मृत्यू आणि १,००० पेक्षा जास्त इस्रायली लोक जखमी झाल्याचे सूत्रांकडून समजते.

अनेक जण भीतीने थरथरले...

कतारमधील अमेरिकन एअर बेसवर झालेल्या हल्ल्यावेळी अचानक भीषण आवाज झाले. इमारत हलली, खिडक्याही थरथरल्या. बाहेर पाहिले, तर आकाशात स्फोट होत होते. दृश्यच विचित्र आणि धक्कादायक होते, असे कतारमधील जॉर्जटाउन विद्यापीठात प्राध्यापक असलेले मेहरान कामरावा यांनी एका वेबसाईटला सांगितले. 

त्यांचे घर अल उदीद हवाई तळापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे. ते म्हणाले, माझे शेजारी पळत होते. अनेकजण घाबरलेले होते. काही तर घाबरून रडायलाही लागले होते. गेल्या १८ वर्षांत कधीच सायरनचा आवाज ऐकला नव्हता.

सीरियातील अमेरिकी लष्करी तळावरही इराणचा हल्ला

अमेरिकेने रविवारी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सोमवारी सीरियातील एका अमेरिकी लष्कर तळावर हल्ला केला. मात्र या घटनेस अमेरिकेने दुजोरा दिला नाही. या हल्ल्यात किती लोक जखमी किंवा मृत झाले याची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही.

मध्यरात्री काय घडले, अपडेट...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या सिच्युएशन रूममध्ये आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि संयुक्त लष्करी दलांचे अध्यक्ष जनरल डॅन केन उपस्थित आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

ड्रील बेबी ड्रील, तेलाचे उत्पादन वाढवा

तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिका व इतर तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ड्रील बेबी ड्रील, मी म्हणतोय आताच, सगळ्यांनी, तेलाच्या किमती खाली ठेवा.

कतारची हवाई हद्द बंद

इराण-इस्रायलमधील वाढता संघर्ष, अमेरिकेचे हल्ले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कतारने हवाई हद्द तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिझेल, भांडार आणि इतर पुरवठादारांचीही साधारण २१७ कोटींची देणी थकलेली आहेत.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाsaudi arabiaसौदी अरेबियाwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प