ज्याची भीती तेच झाले! अमेरिकेशी युद्धाची शक्यता असतानाच इराणमध्ये मोठे स्फोट? तणाव वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 22:38 IST2026-02-18T22:35:36+5:302026-02-18T22:38:39+5:30
Tehran Iran Blast News: इराणच्या तेहरात येथील स्फोट हे वाढत्या तणावाच्या काळात झाल्याने संशयाचे धुके दाट झाल्याचे म्हटले जात आहे.

ज्याची भीती तेच झाले! अमेरिकेशी युद्धाची शक्यता असतानाच इराणमध्ये मोठे स्फोट? तणाव वाढणार
Tehran Iran Blast News: इराणच्या तेहरान प्रांतात मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तेहरान शहरातील एका इमारतीमध्ये स्फोट होऊन धुराचे मोठे लोट दिसत आहेत. सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. परंतु, इराणच्या सरकारी माध्यमांनी अग्निशमन विभागाच्या हवाल्याने म्हटले आहे की, शहराजवळ दिसणारा काळा धूर हा नदीजवळ लागलेल्या आगीमुळे निर्माण झाला होता. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असल्याचेही अग्निशमन विभागाने म्हटले आहे. इराणने कोणतीही जीवितहानी झाल्याचे नाकारले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या तणावादरम्यान अलीकडच्या काळात इराणमध्ये अनेक स्फोट झाले. परंतु, हा झालेला स्फोट बाहेरील कारणांमुळे किंवा बाहेरून झालेला हल्ला असल्याचा दावा इराणने फेटाळून लावला आहे. याशिवाय, शिराझ प्रांतातील शहराच्या बाहेरील डोंगराळ भागात स्फोटाचा आवाज ऐकू आले आहेत. परंतु, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
अमेरिकेने लष्करी ताकद वाढवली
इराणच्या तेहरात येथील स्फोट हे वाढत्या तणावाच्या काळात झाल्याने संशयाचे धुके दाट झाल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका मध्य पूर्वेत अधिक लढाऊ विमाने, युद्धनौका आणि हवाई संरक्षण प्रणालींसह आपली लष्करी ताकद वाढवत आहे. इराणशी त्यांच्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी सुरू आहेत. राजनैतिक धोरण अयशस्वी झाले तर दोन्ही देशांत संघर्षाचा धोका बळावला आहे.
दरम्यान, इराण गुप्तपणे युद्धाची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. इराण महत्त्वाच्या लष्करी ठिकाणी काँक्रीटचे रक्षाकवच बनवत आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून शोध लागू नये म्हणून, इराणने हा भाग मातीने झाकल्याचे सांगितले जात आहे. उपग्रह यासंदर्भातील छायाचित्रे आणि संपूर्ण प्रक्रिया टिपली आहे. इराण ज्या ठिकाणी नवीन संरचना बांधत आहे, ही तीच ठिकाणे आहेत, जिथे २०२४ मध्ये इस्रायलने स्फोट केले होते.