शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'; अमेरिकेसमोर ठेवली तगडी अट, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:46 IST

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर सुरक्षेची गॅरंटी आणि तात्काळ युद्धविराम या अटी ठेवल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या ज्वाळा आता शांत होण्याची चिन्हे दिसत असली, तरी इराणने यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. "आम्हाला युद्ध नको आहे, पण जर शांतता हवी असेल तर भविष्यात आमच्यावर हल्ले होणार नाहीत, याची ठोस लेखी गॅरंटी द्या," अशा शब्दांत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकेसह पाश्चात्य राष्ट्रांना ठणकावून सांगितले आहे.

शांततेसाठी पहिली अट: तात्काळ युद्धविराम

इराणच्या सरकारी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पेजेश्कियान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्वात पहिले पाऊल म्हणजे तात्काळ हल्ले थांबवणे. जोपर्यंत गोळीबार आणि हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणतीही शांतता चर्चा यशस्वी होऊ शकत नाही," असे पेजेश्कियान यांनी स्पष्ट केले. इराणने कधीही तणाव वाढवलेला नाही, मात्र आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करणे ही आमची मजबुरी!

शेजारील देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना राष्ट्राध्यक्षांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला. ते म्हणाले की, "आम्ही शेजारी देशांच्या सीमांचा आदर करतो. मात्र, ज्या देशांनी आपल्या जमिनीचा वापर इराणविरुद्ध हल्ले करण्यासाठी अमेरिकेला करू दिला, त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे ते उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत स्वसंरक्षणासाठी अमेरिकन तळांना लक्ष्य करणे ही इराणची मजबुरी बनली आहे."

युरोपियन युनियनच्या दुटप्पी भूमिकेवर टीका

पेजेश्कियान यांनी यावेळी युरोपियन युनियनवर सडकून टीका केली. इराणवर होणाऱ्या लष्करी कारवायांची युरोपने उघडपणे निंदा केली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. युरोपने केवळ स्वतःच्या सोयीचे राजकारण न करता आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर आपली भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

युरोपियन परिषदेचे आश्वासन

दरम्यान, अँटोनियो कोस्टा यांनी इराणला आश्वासन दिले की, युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी इराणविरुद्धच्या कोणत्याही आक्रमक कारवाईला पाठिंबा दिलेला नाही. उलट, अशा कारवाया आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी मान्य केले. प्रादेशिक तणाव कमी करून राजकीय आणि आर्थिक नुकसान टाळणे ही काळाची गरज असल्याचे कोस्टा यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's 'Master Plan' to Halt War; Sets Strong Condition for US

Web Summary : Iran demands written guarantees against future attacks to halt West Asia conflict. Immediate ceasefire is crucial for peace talks. Iran defends targeting US bases as self-defense against nations aiding attacks, criticizing EU's stance.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर