"ना आता, ना कधीही...तुमच्यासारख्या माणसाच्या..."; इराणच्या सैन्यानं उडवली ट्रम्प यांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:47 IST2026-03-25T17:45:23+5:302026-03-25T17:47:00+5:30

आमचा पहिला आणि अखेरचा शब्द पहिल्या दिवसापासून एकसारखा आहे आणि तो तसाच राहील असं इराणी सैन्याने ट्रम्प यांना म्हटलं.

Iran Lt. Col. Ebrahim Zolfaghari mocks US President Donald Trump claim of US-Iran negotiations | "ना आता, ना कधीही...तुमच्यासारख्या माणसाच्या..."; इराणच्या सैन्यानं उडवली ट्रम्प यांची खिल्ली

"ना आता, ना कधीही...तुमच्यासारख्या माणसाच्या..."; इराणच्या सैन्यानं उडवली ट्रम्प यांची खिल्ली

तेहरान - अमेरिकेकडून युद्ध संपवण्याच्या दिशेने पावले टाकत असतानाच इराणी सैन्याने अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. आमच्यासारखी व्यक्ती तुमच्या सारख्या माणसासोबत कुठलीही तडजोड करणार नाही असं विधान इराणी सैन्याचे खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट इब्राहिम झुल्फिकारी यांनी म्हटलं आहे.

इराणच्या लष्कराचे हे मुख्यालय इराणच्या नियमित सैन्य आणि निमलष्करी क्रांती रक्षक दलाला संयुक्त कमांड सांभाळते. लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी यांचे हे विधान इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रसारित करण्यात आले आहे. खरेच अमेरिकन दाव्यानुसार इराणसोबत युद्धबंदीवर पडद्यामागे चर्चा सुरू आहे का? असा प्रश्न इराणी सैन्याच्या या विधानावरून आता उभा राहिला आहे. खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची खिल्ली उडवत तुमचे अंतर्गत संघर्ष इतक्या टोकाला गेले आहेत का की तुम्ही स्वतःशीच बोलत आहात असा टोला लगावला आहे.

झुल्फिकारी यांनी म्हटलं की, आमचा पहिला आणि अखेरचा शब्द पहिल्या दिवसापासून एकसारखा आहे आणि तो तसाच राहील. माझ्यासारखा कोणीही तुमच्यासारख्या व्यक्तीशी कधीही तडजोड करणार नाही. आता नाही, कधीच नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अधिकारी इराणसोबत चर्चा करत आहेत असं म्हटलं होते. परंतु झुल्फिकारी यांच्या रेकॉर्ड व्हिडिओमुळे अशी कुठली चर्चा सुरू आहे का हा सवाल प्रत्येकाला पडला आहे. तसेच ज्या सामरिक सामर्थ्याबद्दल तुम्ही पूर्वी बोलत होता, त्याचे आता सामरिक अपयशात रूपांतर झाले आहे असंही झुल्फिकारी यांनी म्हटलं.

तर जे स्वतःला जागतिक महासत्ता म्हणवतात, त्यांच्या हातात काही असते तर ते आतापर्यंत या पेचप्रसंगातून बाहेर पडले असते. तुमच्या पराभवाला तडजोड म्हणू नका. तुमच्या पोकळ आश्वासनांचा काळ संपला. आज जगात फक्त दोनच बाजू आहेत. सत्य आणि असत्य..आणि स्वातंत्र्याची इच्छा असणारा कुठलाही व्यक्ती तुमच्या शब्दांना भूलणार नाही. या प्रदेशातील स्थिरता केवळ आमच्या लष्कराच्या सामर्थ्यानेच सुनिश्चित केली जाते. जोपर्यंत इराणी जनतेविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा तुमचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकला जात नाही, तोपर्यंत परिस्थिती सामान्य होणार नाही अशी ताकीदही इराणी सैन्याने डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे.

सैन्य पाठवण्याची अमेरिकेची तयारी

इराण अमेरिका लढाईत आता अमेरिकेच्या ८२ व्या एअरबोर्न बटालियनचे कमीत कमी १ हजार सैनिक येणाऱ्या काळात मध्य पूर्वेत पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पेंटागन २ मरीन युनिटही तैनात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यात या भागातील किमान ५ हजार मरीन आणि हजारो नाविकांची संख्या वाढू शकते. यातच हवाई हल्ल्यांनी इराणला मोठा फटका बसला आहे तर इराणी क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोननी इस्रायल तसेच प्रदेशातील इतर लक्ष्यांना लक्ष्य केले आहे.

Web Title : ईरान की सेना ने ट्रम्प का उड़ाया मजाक: तुम्हारे जैसे व्यक्ति से समझौता नहीं।

Web Summary : ईरानी सेना के अधिकारियों ने राष्ट्रपति ट्रम्प का मजाक उड़ाते हुए कहा कि वे उनके जैसे किसी व्यक्ति के साथ कभी समझौता नहीं करेंगे। यह अमेरिका-ईरान वार्ता के दावों के बाद आया है, जिसका ईरान ने खंडन किया है। मध्य पूर्व में अमेरिकी सैन्य उपस्थिति बढ़ने से तनाव बना हुआ है।

Web Title : Iran military mocks Trump: No compromise with someone like you.

Web Summary : Iranian military officials mocked President Trump, stating they would never compromise with someone like him. This follows claims of US-Iran talks, which Iran denies. Tensions remain high as the US increases its military presence in the Middle East.