जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:11 IST2026-04-06T16:10:37+5:302026-04-06T16:11:38+5:30

इराण सध्या युद्धाच्या छायेत असला तरी, एका क्षेत्रात मात्र या देशाने जगातील मोठ्या देशांना आणि खुद्द अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

iran literacy rate surpasses usa amazing progress in education and women empowerment | जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!

जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाकडे लागले आहे. इराण सध्या युद्धाच्या छायेत असला तरी, एका क्षेत्रात मात्र या देशाने जगातील मोठ्या देशांना आणि खुद्द अमेरिकेलाही मागे टाकले आहे. ते क्षेत्र म्हणजे शिक्षण. गेल्या काही दशकांत इराणने शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या अमेरिकेला महासत्ता मानले जाते, तो देश मूलभूत साक्षरतेच्या बाबतीत इराणच्या आसपासही नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

३७ टक्क्यांवरून थेट ८९ टक्क्यांवर झेप!

इराणचा साक्षरतेचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा प्रेरणादायी आहे. १९७६ मध्ये इराणचा साक्षरता दर केवळ ३७% इतका होता. मात्र, शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि नियोजनामुळे आज हा दर सुमारे ८९% वर पोहोचला आहे. तरुणांच्या बाबतीत तर इराणने कमालच केली आहे. १५ ते २४ वयोगटातील तरुणांचा साक्षरता दर तब्बल ९८.८% इतका विक्रमी आहे.

महासत्ता अमेरिका का पडली मागे?

दुसरीकडे, अमेरिकेची शिक्षण व्यवस्था विकसित मानली जात असली तरी, तिथल्या साक्षरतेची आकडेवारी धक्कादायक वास्तव मांडते. अमेरिकेतील प्रौढ साक्षरता दर केवळ ७९% आहे. याचाच अर्थ असा की, अमेरिकेतील दर पाचपैकी एका व्यक्तीला लिहिण्या-वाचण्यात अडचणी येतात. सुमारे ४.३ कोटी अमेरिकन नागरिक आजही मूलभूत साक्षरतेच्या आव्हानांचा सामना करत आहेत.

इराणी महिलांचे शिक्षण क्षेत्रात वर्चस्व

इराणच्या या यशात महिलांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. इराणमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक क्षेत्रांत पदवी घेणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ७२% आहे. ग्रामीण भागातही शिक्षण पोहोचवण्यावर इराणने भर दिला असून, तिथला साक्षरता दर आता ९९ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.

अमेरिकेसमोर नेमकी अडचण काय?

अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन जागतिक दर्जाचे असले तरी, सार्वजनिक शाळांमधील त्रुटी, भाषेतील विविधता आणि सामाजिक विषमता यामुळे मूलभूत साक्षरतेचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. याउलट, इराणने आपल्या प्रत्येक नागरिकाला किमान प्राथमिक शिक्षण मिळेल, याची खात्री केल्याने आज हा देश साक्षरतेच्या बाबतीत जगाचा 'रोल मॉडेल' ठरत आहे.

Web Title : शिक्षा में ईरान ने अमेरिका समेत कई देशों को पछाड़ा: एक खुलासा

Web Summary : युद्ध के बावजूद, ईरान शिक्षा में उत्कृष्ट है, साक्षरता में अमेरिका को भी पीछे छोड़ दिया है। ईरान की साक्षरता दर 37% से बढ़कर 89% हो गई, युवाओं की साक्षरता 98.8% है। प्रणालीगत मुद्दों के कारण अमेरिका 79% वयस्क साक्षरता दर के साथ पीछे है।

Web Title : Iran Outpaces Global Powers, Including US, in Education: A Revelation

Web Summary : Despite conflict, Iran excels in education, surpassing the US in literacy. Iran's literacy rate soared from 37% to 89%, with youth literacy at 98.8%. The US lags behind with a 79% adult literacy rate due to systemic issues.