इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:04 IST2025-06-19T16:01:48+5:302025-06-19T16:04:24+5:30

इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे.

Iran-Isreal War: US has deployed fighter jets, warships, and troops across the Middle East to protect Israel and deter Iran | इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर

इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर

Iran-Isreal War: इराण इस्त्रायल युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर घातक हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडेच इराणच्या सैन्याने इस्त्रायलमध्ये मिसाईलचा पाऊस पाडला. ज्यात बीर्शेबा येथील एका हॉस्पिटलला टार्गेट करण्यात आले. इराणी हल्ल्यात सोरोका हॉस्पिटलचे प्रचंड नुकसान झाले. या हल्ल्यात कमीत कमी ६५ जण जखमी झाल्याचे इस्त्रायली आपत्कालीन सेवेकडून सांगण्यात आले.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे परंतु हा हल्ला कधी आणि कसा होणार याबाबत अद्याप आदेशाला मंजुरी नाही. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून इराणच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. त्यातच अमेरिकेने इराणविरोधात डाव आखणे सुरू केले आहे. इराणच्या शेजारील मुस्लीम देशांसोबत मिळूनच अमेरिका इराणविरोधात चक्रव्यूह आखत आहे. इस्त्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेचे सैन्य उतरले तर इराणही अमेरिकेवर पलटवार करू शकतो हे अमेरिकेला माहिती आहे. इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे.

४० हजार जवान अलर्ट

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि जॉर्डनसह इतर मध्य पूर्वेतील देशांमध्ये ४० हजार सैन्य जवानांना अलर्टवर ठेवले आहे. अमेरिकन अधिकारी अशा ठिकाणांची माहिती घेत आहेत जिथे इराण हल्ला करू शकते. मध्य पूर्व आणि आसपास अमेरिकन सैन्याचे जवळपास २० तळ आहेत. त्यातील बहुतांश सैन्य तळ इराणी बॅलेस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये आहेत. इराणविरोधातील यु्द्धात उतरताच सर्वात आधी सीरिया, इराक आणि अरब देशांतील त्यांच्या सैन्य तळांना टार्गेट केले जाऊ शकते अशी शंका अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिका या सैन्य तळांवर अमेरिकन जवान तैनात ठेवले आहेत. अमेरिकेने युरोपात १८ रिफ्लुलिंग एअरक्राफ्ट्स पाठवले आहेत. जे लढाऊ विमानाच्या मदतीसाठी सज्ज राहतील. त्यासोबतच अमेरिकेने २ मालवाहू युद्धनौका मध्य पूर्व सागरी क्षेत्रात पाठवल्या आहे. 

Web Title: Iran-Isreal War: US has deployed fighter jets, warships, and troops across the Middle East to protect Israel and deter Iran