युद्धामुळे हाहाकार! भारतच नव्हे तर 'या' ९ देशांवर इंधन संकट; अनेक लॉकडाऊनसारखी परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:32 IST2026-03-10T14:25:20+5:302026-03-10T14:32:15+5:30

मध्य पूर्वेतील संघर्ष जागतिक व्यापारासाठी तोट्याचा ठरत आहे. जगातील जवळपास ३१ टक्के कच्चे तेल आणि एलपीजी गॅस स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गाने निर्यात होते. युद्धामुळे हा मार्ग बाधित झाला आहे.

Iran Isreal US War: Not only India but also these 9 countries are facing fuel crisis; Many are facing lockdown-like situations | युद्धामुळे हाहाकार! भारतच नव्हे तर 'या' ९ देशांवर इंधन संकट; अनेक लॉकडाऊनसारखी परिस्थिती

युद्धामुळे हाहाकार! भारतच नव्हे तर 'या' ९ देशांवर इंधन संकट; अनेक लॉकडाऊनसारखी परिस्थिती

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह अनेक बड्या देशांना इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, पोलंड, व्हिएतनाम, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही भीषण इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. मध्य पूर्वेत आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी खंडीत झाली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग बंद झाल्याने कच्च्या तेलाची किंमत २५ टक्क्यांनी वाढली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून शाळा बंदी, सरकारी कामकाजात कपात यासारखे निर्णय घ्यावे लागत आहेत. मागणी आणि पुरवठा यांच्यातील अनिश्चितेमुळे नागरिकांमध्येही चिंता पसरली आहे. इंधन बचतीसाठी लोक रांगामध्ये उभे आहेत. पाकिस्तानात शाळा बंद झाल्यात, सरकारी कार्यालयांना ४ दिवस वर्क फ्रॉम होम बंधनकारक केले आहे. बांगलादेशातही दुचाकींसाठी २ लीटर इंधन मर्यादा आखून दिली आहे. फ्रान्स, पोलंडमध्येही घाबरलेल्या लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. महागाई वाढण्याची भीती लोकांमध्ये आहे. व्हिएतनाममध्ये सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर दिला जात आहे. 

मध्य पूर्वेतील संघर्ष जागतिक व्यापारासाठी तोट्याचा ठरत आहे. जगातील जवळपास ३१ टक्के कच्चे तेल आणि एलपीजी गॅस स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गाने निर्यात होते. युद्धामुळे हा मार्ग बाधित झाला आहे. ज्यातून जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर कच्च्या तेलाची किंमत १२० ते १४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचेल. त्यातून जागतिक शेअर बाजारातही उलथापालथ होईल. पाकिस्तानात स्थिती भयंकर झाली आहे. इंधन बचतीसाठी येथील सरकारने शाळांना २ आठवडे सुट्टी दिली आहे. सरकारी कार्यालयही केवळ ४ दिवस उघडतील. बांगलादेशात दुचाकीला २ लीटर आणि कारला १० लीटर पेट्रोलची मर्यादा घातली आहे. पेट्रोल साठा रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. 

दरम्यान, फ्रान्स, जर्मनीसारख्या युरोपीय देशांतही तेलाच्या किंमतीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. भविष्यातील चिंता सतावत असल्याने फ्रान्समध्ये लोकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. जर्मनी लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर दिला जात आहे. पोलंडमध्येही स्थिती तणावपूर्ण आहे. याठिकाणी एका आठवड्यात पेट्रोलचे दर १४ टक्क्यांनी वाढले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा, लुइसियाना येथे गॅसच्या किंमती ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. व्हिएतनाम येथे जनतेला इंधन वाचवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Web Title : युद्ध से ईंधन संकट: भारत सहित 9 देशों में हाहाकार!

Web Summary : मध्य पूर्व में युद्ध से भारत समेत कई देशों में ईंधन संकट गहराया। आपूर्ति बाधित, कीमतें बढ़ीं। स्कूल बंद, वर्क फ्रॉम होम जैसे उपाय किए जा रहे हैं, जनता में चिंता और आर्थिक अस्थिरता बढ़ रही है।

Web Title : War Sparks Fuel Crisis: India & 9 Nations Face Hardship

Web Summary : Middle East conflict disrupts global fuel supply, impacting India and others. Nations face shortages, price hikes, and rationing. Measures like school closures and work-from-home are implemented amid rising public concern and economic instability.