"आधी इराणला संपवणार, मग...", डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; कोणता देश अमेरिकेचं पुढचं टार्गेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:10 IST2026-03-06T08:10:26+5:302026-03-06T08:10:44+5:30

इराणच्या नौदललाही मोठे नुकसान झाले आहे. केवळ ३ दिवसांत इराणच्या २४ जहाजांना नष्ट करण्यात आलं असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Iran Isreal US War: After finish war with iran, then america will turning its attention to Cuba - US President Donald Trump | "आधी इराणला संपवणार, मग...", डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; कोणता देश अमेरिकेचं पुढचं टार्गेट?

"आधी इराणला संपवणार, मग...", डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; कोणता देश अमेरिकेचं पुढचं टार्गेट?

वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात आणखी एक मोठं विधान केले आहे. सध्या इराणशी सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने अमेरिकेचे प्राधान्य आहे. हे युद्ध संपल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष क्बूयावर असू शकते असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. 

व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. फुटबॉल क्लबच्या इंटर मायामी विजयानंतर जल्लोष करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आता अमेरिकेचे संपूर्ण लक्ष इराणविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईवर आहे. आम्हाला आधी हे युद्ध संपवायचे आहे. परंतु त्यानंतर जास्त वेळ लागणार नाही, जेव्हा अमेरिकेचे लक्ष क्यूबाच्या दिशेने असेल. क्यूबाला अमेरिकेसोबत करार करायचा आहे आणि तिथे राहणारे बरेच लोक भविष्यात त्यांच्या देशात परत जाऊ शकतात असं ट्रम्प यांनी सांगितले.

तसेच इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत ट्रम्प यांनी आत्मविश्वास दाखवला. अमेरिका आणि त्याचा सहकारी इस्रायल मिळून शत्रूला कमकुवत आहे. अमेरिकन सैन्य आणि इस्रायली सैन्याने मिळून युद्धात निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा अधिक यश मिळवले आहे. इराणच्या सैन्याला प्रचंड नुकसान पोहचवले आहे. इराणचे हवाई दल जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांचे एअर डिफेन्सही कमकुवत झाले आहे. इराणच्या नौदललाही मोठे नुकसान झाले आहे. केवळ ३ दिवसांत इराणच्या २४ जहाजांना नष्ट करण्यात आलं असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

दरम्यान, इराण आता चर्चेला तयार असल्याचे दिसून येते. युद्ध संपवण्यासाठी इराणला चर्चा करायची आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. मात्र अमेरिका अद्यापही हे युद्ध सुरू ठेवेल. जर संघर्ष पुढे सुरूच राहिला तर इराणला आणखी गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या युद्धातही जागतिक तेल बाजारात किंमती बऱ्यापैकी स्थिर आहेत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. जर इराणसोबत युद्ध संपले तर अमेरिकेचे पुढचे लक्ष आणि रणनीती खरेच क्यूबाकडे असेल का अशी चर्चा ट्रम्प यांच्या विधानानंतर सुरू झाली आहे. 

Web Title : ईरान के बाद, क्या क्यूबा अगला? ट्रम्प ने अमेरिकी विदेश नीति में बदलाव का संकेत दिया

Web Summary : ट्रम्प ने संकेत दिया कि ईरान के साथ संघर्ष को हल करने के बाद, अमेरिका क्यूबा पर ध्यान केंद्रित कर सकता है। उन्होंने दावा किया कि ईरान की सेना कमजोर हो गई है और सुझाव दिया कि क्यूबा अमेरिका के साथ एक समझौता चाहता है, जिससे संभावित रूप से उसके नागरिकों की वापसी हो सकती है। ईरान के साथ बातचीत जारी है।

Web Title : After Iran, Cuba Next? Trump Hints at US Foreign Policy Shift

Web Summary : Trump indicated that after resolving the conflict with Iran, the US may focus on Cuba. He claimed Iran's military has been weakened and suggested Cuba desires a deal with America, potentially leading to the return of its citizens. Discussions with Iran are reportedly ongoing.