अमेरिका-इस्रायलचं भय नाही, श्रीलंकेने दिला इराणी जहाजाला आश्रय; डोनाल्ड ट्रम्प संतापणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:31 IST2026-03-06T12:30:10+5:302026-03-06T12:31:12+5:30
श्रीलंकेने इराणी जहाजाला त्यांच्या बंदरावर आश्रय देऊन आणि नाविकांना संरक्षण देत अमेरिकेची नाराजी ओढून घेतली आहे.

अमेरिका-इस्रायलचं भय नाही, श्रीलंकेने दिला इराणी जहाजाला आश्रय; डोनाल्ड ट्रम्प संतापणार?
कोलंबो - श्रीलंकन सरकारने हिंद महासागरात अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणी जहाजाला त्यांच्याकडे आश्रय दिला आहे. अमेरिकेने एका जहाजावर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या जहाजाने श्रीलंकेकडे पोर्टवर जहाज डॉक करण्याची आणि क्रू मेंबर्सना देशात येण्याची परवानगी मागितली होती. त्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी मान्यता दिली. बुधवारी अमेरिकेने इराणी जहाज टॉरपीडोतून हल्ला करून बुडवले होते. या हल्ल्यात ८७ इराणी नाविकांचा मृत्यू झाला.
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं की, इराणचे दुसरे नौदली जहाज IRINS बुशहरने ते देशातील कुठल्याही पोर्टवर डॉक करू शकतात का अशी श्रीलंकेच्या सरकारकडे विचारणा केली. या जहाजावर २०८ लोक होते, ज्यात ५३ अधिकारी, ८४ कॅडेट ऑफिसर, ४८ सिनीअर्स सेलर्स, २३ सेलर्स यांना राजधानी कोलंबो येथे येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय या जहाजाला जगातील सर्वात व्यस्त कमर्शियल पोर्टपैकी एक कोलंबोऐवजी त्रिंकोमालीमध्ये कस्टडीत घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
No civilian should die in wars. Our approach is that every life is as precious as our own. We jealously guard our non-aligned policy while ensuring that humanitarian values and the saving of lives remain our top priority.
— Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) March 6, 2026
What the world urgently needs today is peace. There is a… pic.twitter.com/ELVOP9dER0
अमेरिकेच्या नाराजीकडे श्रीलंकेचे दुर्लक्ष
श्रीलंकेने इराणी जहाजाला त्यांच्या बंदरावर आश्रय देऊन आणि नाविकांना संरक्षण देत अमेरिकेची नाराजी ओढून घेतली आहे. माणुसकीच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे श्रीलंकेने सांगितले. त्याशिवाय श्रीलंकेचे नौदल समुद्रात उद्ध्वस्त झालेल्या जहाजाचा मलबा जमा करत आहे. जखमी नाविकांवर उपचार करत आहे. श्रीलंका आणि इराण यांच्यात मजबूत राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. श्रीलंकेने इराणकडून २५० मिलियन डॉलर कच्चे तेल खरेदी केले होते. या दोन्ही देशात तेलाच्या बदल्या चहा अशी बार्टर डिल सहमती झाली होती. ज्यातून श्रीलंका इराणला चहाचे हफ्त्यातून पेमेंट करू शकत होता.
हे इराणी जहाज श्रीलंकेच्या विशेष आर्थिक क्षेत्रात होते आणि संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्यानुसार ते जहाज समुद्राच्या त्या भागात होते जे कोणत्याही देशाच्या सागरी क्षेत्राबाहेर होते, परंतु श्रीलंकेला त्या जहाजाची तपासणी करण्याचा पूर्ण अधिकार होता. IRINS बुशेहरला त्रिंकोमालीमध्ये डॉक करण्याची परवानगी देणे हा श्रीलंकेसाठी एक मोठा भूराजकीय निर्णय आहे. त्रिंकोमालीला खूप महत्त्व आहे. पृथ्वीवरील खोल पाण्यातील नैसर्गिक बंदरांपैकी एक म्हणून ते ओळखले जाते. ब्रिटीश साम्राज्याने ते संपूर्ण हिंद महासागरातील सर्वात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे नौदल स्थान मानले होते. आशियातील सिंगापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर हे आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान एप्रिल १९४२ मध्ये जपानी लोकांनी त्रिंकोमालीवर बॉम्बहल्ला केला आणि एचएमएस हर्मीस नष्ट केले. बंगालच्या उपसागरातून आणि हिंद महासागरात नौदल पाठवू इच्छिणारी कोणतीही शक्ती नेहमीच या बंदरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. भारताचे त्रिंकोमालीशी वर्षानुवर्षे जवळचे धोरणात्मक संबंध आहेत. शिवाय अमेरिका श्रीलंकेच्या विशाल सागरी क्षेत्राचा वापर ट्रान्झिट झोन म्हणून करते. कोलंबो बंदरात चीनने महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. इराणी जहाजाला श्रीलंकेने आश्रय दिल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. इराणवर अमेरिका इस्रायलचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. त्यात श्रीलंकेला ट्रम्प यांच्याकडून इशाराही मिळू शकतो. ट्रम्प यांच्या नजरेने मानवीय मदतीला किंमत नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या नाराजीचा सामना करण्यासाठी श्रीलंका सरकारची तयारी असायला हवी.