Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:46 IST2025-06-23T16:39:38+5:302025-06-23T16:46:57+5:30

Iran Israel War : अमेरिकेने रविवारी इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ले केले. यानंतर आता इराणने रशियाकडे मदत मागितली आहे.

Iran Israel War Putin, help us Khamenei remembered Russia after Israel dropped bombs, sent the Foreign Minister as an envoy | Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले

Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले

Iran Israel War : मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. अमेरिकेने रविवारी (२२ जून रोजी ) इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, आता इराणने आपला मित्र असलेल्या रशियाकडे मदत मागितली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पाठिंबा मागण्यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोमवारी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना मॉस्कोला पाठवले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल यांनी खमेनी यांची इराणमधील राजवट बदलण्याबाबत चर्चा केली आहे, यामुळे मध्य पूर्व अराजकतेत बुडण्याची भीती रशियाला वाटत आहे. इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली आहे.

पुतिन यांनी इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला आहे परंतु इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यांवर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी शांततेचे आवाहन केले आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिली.

खामेनी यांचे पत्र आणि इराणची नाराजी

रॉयटर्सने एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हे खामेनी यांचे पत्र पुतिन यांना सुपूर्द करणार आहेत. या पत्रात रशियाकडून पाठिंबा मागितल्याचे समर्थन असल्याचे वृत्त आहे. इराणी सूत्रांनी सांगितले की, इराणी सरकार आतापर्यंत रशियाच्या पाठिंब्यावर खूश नाही आणि पुतिन यांनी इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध अधिक सक्रिय व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. अजूनही इराणला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे स्पष्ट झालेले नाही.

क्रेमलिन यांनी सांगितले की, पुतिन अराक्ची यांना भेटतील पण चर्चेचे विषय त्यांनी स्पष्ट केले नाहीत. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि रशिया त्यांच्या रणनीतींमध्ये समन्वय साधत असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Iran Israel War Putin, help us Khamenei remembered Russia after Israel dropped bombs, sent the Foreign Minister as an envoy