शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:55 IST

Iran-Israel War: इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खामेनी राजवटीचा अंत करणे.

Iran-Israel War:इराणचे निर्वासित राजपुत्र रेझा शाह पहलवी यांनी इराण-इस्रायल संघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांसाठी इस्लामिक रिपब्लिकच्या(इराण) अणु महत्त्वाकांक्षेला जबाबदार धरले. तसेच, त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. शांतता हाच या राजवटीचा अंत करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे, असेही त्यांनी म्हटले.

इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रेझा शाह पहलवी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेले हल्ले हे इस्लामिक रिपब्लिकच्या अणु शस्त्रांच्या विनाशकारी प्रयत्नांचे परिणाम आहेत. यामुळे इराणी लोकांचे हित धोक्यात आले आहे. खमेनी आणि त्यांच्या कोसळणाऱ्या दहशतवादी राजवटीने राष्ट्राला अपयशी ठरवले आहे.'

'खमेनी यांनी राजीनामा द्यावा'त्यांनी खमेनींना आवाहन केले की, 'तुमच्या भूमिगत बंकरमधून बदला घेण्याचा विचार करण्याऐवजी, इराणी लोकांच्या हितासाठी राजीनामा द्या, जेणेकरून गौरवशाली इराणी राष्ट्र इस्लामिक रिपब्लिकच्या विनाशकारी युगाला मागे टाकू शकेल आणि शांतता, समृद्धी आणि महानतेचा एक नवीन अध्याय सुरू करू शकेल.' रजा शाह यांनी यावर भर दिला की, इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे या व्यवस्थेचा (खामेनी राजवटीचा) अंत करणे.

यापूर्वीही टीका केलेली रेझा शाह पहलवी यांनी यापूर्वीही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर टीका केली होती. खमेनी घाबरलेल्या उंदरासारखे भूमिगत झाले आहेत, आता त्यांच्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही, असे ते म्हणाले होते. तसेच, त्यांनी इराणच्या लोकांना एकत्र येऊन सत्तांतराचे आवाहन केले होते. 

अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

कोण आहेत रेझा शाह?रेझा शाह पहलवी हे शाह मोहम्मद रजा पहलवी यांचे पुत्र आहेत. त्यांनी बराच काळ इराणची सत्ता भोगली होती. १९७९ पर्यंत ते इराणचे प्रमुख होते. परंतु ३७ वर्षांपूर्वी झालेल्या क्रांतीने इराणची धार्मिक-सामाजिक रचना पूर्णपणे बदलून टाकली. त्यानंतर शाह मोहम्मद रजा पहलवी यांना आपला जीव वाचवण्यासाठी इजिप्तला पळून जावे लागले.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिकाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प