शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:13 IST

Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली.

Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमध्येयुद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी गुरुवारी(दि.२६) इस्रायलविरुद्धच्यायुद्धात विजयाचा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराणने अमेरिकेला जोरदार धोबाडीत मारली. अमेरिकेने इस्रायलला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीने मंगळवारी लागू झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर खामेनी यांनी ही पहिलीच टिप्पणी आहे.

अमेरिकेने हस्तक्षेप का केला? खामेनी म्हणालेइराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ संदेशात खामेनी म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक विजयी झाला अन् अमेरिकेच्या थोबाडीत मारली. खामेनी यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या मध्यस्थीवरही भाष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेने हस्तक्षेप केला, कारण त्यांना वाटले की, जर त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर झिओनिस्ट राजवट (इस्रायल) पूर्णपणे नष्ट होईल. या युद्धाचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

१३ जून नंतर पहिल्यांदाच खामेनी सर्वांसमोर आले१३ जून रोजी युद्ध सुरू झाल्यापासून सर्वोच्च नेते खामेनी सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केल्याने युद्ध सुरू झाले. तेव्हापासून असे म्हटले जात होते की, खामेनी एका गुप्त ठिकाणी लपून बसले आहेत. १९ जून रोजी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला, परंतु तो त्यांच्या बंकरमधूनच रेकॉर्ड करण्यात आला. 

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख

आता गुरुवारी त्यांनी आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला, जो इराणी सरकारी चॅनेल आणि त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टाकण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी इस्रायलवरील विजयाबद्दल आपल्या नागरिकांना अभिनंदन केले आणि हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्धAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प