सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 00:22 IST2025-07-18T00:21:37+5:302025-07-18T00:22:24+5:30

Iran Israel Syria Conflict: इस्रायलने सिरियात केलेले हल्ले हे नेतान्याहू यांच्या नियोजनाचा भाग असल्याचे मानले जात आहे

iran israel syria war golan heights missile shield strategy proxy troops controls | सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन

सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन

Israel Syria Conflict Iran : मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इस्रायलनेसीरियावर भयंकर हल्ले केले. ज्यामुळे इराण संतप्त झाला आहे. इस्रायलनेसीरियात हल्ले करून सूचित केले आहे की आता इस्रायलचा पुढचा हल्ला इराणवर असेल. इस्रायलची योजना सीरियाचा मोठा भाग ताब्यात घेण्याची आहे. तेथून पुढे गोलान हाइट्सचा विस्तार करून, नंतर त्या जमिनीचा वापर सुरक्षा वर्तुळ तयार करण्याची इस्रायलची योजना आहे. त्यामुळे इराणने प्रत्युत्तर दिले तर क्षेपणास्त्रे सीरिया ओलांडू शकणार नाहीत, अशी इस्रायलची रणनिती आहे. त्यामुळे संतप्त इराणने प्रॉक्सी गटांना इस्रायलला वेढा घालण्याचे आदेश दिले आहेत.

सीरियाला युद्धभूमी बनवण्याचा इस्रायलचा प्लॅन

इस्रायल सीरियावर सतत हल्ले करत आहे. सीरियावर जितके जास्त हल्ले होत आहेत, तितकी इराणमध्ये दहशत वाढत आहे. अल शरा यांना मारण्याच्या धमकीमुळे खामेनींची अस्वस्थता वाढत आहे. सीरियातील विनाशामागील इस्रायलचे हेतू खामेनींना समजले आहेत. असे मानले जाते की सीरियावरील हल्ला हा फक्त एक निमित्त आहे. खरा हेतू इराणचा नाश करण्याचा आहे. इस्रायल अचानक सीरियाबद्दल आक्रमक झालेला नाही. उलट, हा त्यांच्या नियोजनाचा एक भाग आहे.

सीरियावरील हल्ल्यामागील कारण समजून घ्या

इस्रायलने सीरियावर हल्ला करण्यामागील पहिले कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष अल शारा यांना नियंत्रित करणे, दुसरे उद्दिष्ट म्हणजे गोलान हाइट्सचा विस्तार करणे, तिसरे उद्दिष्ट म्हणजे इराणच्या प्रॉक्सी गटांना विस्तार होण्यापासून रोखणे आणि चौथे कारण म्हणजे हिजबुल्लाहचा शस्त्रास्त्र पुरवठा मार्ग तोडणे. याशिवाय, पाचवे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे सीरियाचा संरक्षण क्षेत्र म्हणून वापर करणे. प्रत्यक्षात, सीरियावर हल्ला करून, इस्रायल इराणवर हल्ला करण्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहे. एकदा इराणी प्रॉक्सी नियंत्रित झाले की, सीरियाच्या हवाई क्षेत्राचा वापर करून, इराणमध्ये विनाश घडवला जाईल, असे जाणकारांचे मत आहे.

इराणचे जोरदार प्रत्युत्तर

१३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला, पण इराणने पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले. यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांना समजले की इराणला ते जितका कमकुवत समजत होते, तितका तो कमकुवत नाही. उलट, गेल्या १० वर्षांत इराणने स्वतःला खूप मजबूत बनवले आहे. म्हणूनच इराणने इस्रायलच्या हैफा आणि तेल अवीववर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. आता इराण दीर्घयुद्धाची तयारी करत आहे. यासाठी ते सतत प्रॉक्सी गटांना बळकटी देत आहेत. त्याचा भाग म्हणून सिरियावरील हल्ल्यानंतर प्रॉक्सी गटांकरवी इस्रायलला घेराव घालण्याचा प्लॅन इराणने आखला आहे.

Web Title: iran israel syria war golan heights missile shield strategy proxy troops controls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.