VIDEO: एकामागून एक मिसाइल पडतच राहिली... इराणच्या 'तेलसमृद्ध' खर्ग बेटांवर अमेरिकेचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 08:56 IST2026-03-14T08:52:12+5:302026-03-14T08:56:29+5:30

US Missile attack on Iran Kharg Islands: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला १ मिनिट ०४ सेकंदांचा व्हिडीओ

Iran Israel America War Updates Missiles kept falling one after another as US military attacks Iran crude oil reach Kharg Islands donald trump post VIDEO | VIDEO: एकामागून एक मिसाइल पडतच राहिली... इराणच्या 'तेलसमृद्ध' खर्ग बेटांवर अमेरिकेचा हल्ला

VIDEO: एकामागून एक मिसाइल पडतच राहिली... इराणच्या 'तेलसमृद्ध' खर्ग बेटांवर अमेरिकेचा हल्ला

US Missile attack on Iran Kharg Islands: अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटांवर हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने बॉम्बहल्ला करून बेट बेचिराख केल्याचा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला असून, हा इराणवरील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी हल्ला मानला जात आहे. ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटांवरील तेल निर्यात केंद्रावरील प्रत्येक लष्करी तळ नष्ट केले आहेत, पण त्या बेटांवरील तेलासंदर्भातील पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हल्ल्याचा व्हिडीओ आला समोर

या व्हिडिओमध्ये खर्ग बेटांवरील लष्करी तळांवर अतिशय निवडकपणे कशा पद्धतीने हल्ले केले गेले हे दाखवले गेले आहे. पूर्ण व्हिडीओ सुमारे १ मिनिट ०४ सेकंदांचा असून त्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्रे पडताना दिसत आहेत. अमेरिकेने इशारा दिला आहे की जर इराण किंवा इतर कोणत्याही देशाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त आणि सुरक्षित मार्गात अडथळा आणला, तर आम्ही ताबडतोब पुढील कारवाई करू आणि खर्ग बेटांवरील उर्वरित पायाभूत सुविधाही नष्ट करू. पाहा व्हिडीओ-

पूर्वीची अमेरिका आणि खर्ग बेटांचा इतिहास

इराण हा ओपेकचा तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो जागतिक तेल पुरवठ्याच्या अंदाजे ४.५% उत्पादन करतो. इराण दररोज अंदाजे ३.३ दशलक्ष बॅरल कच्चे तेल, अंदाजे १.३ दशलक्ष बॅरल कंडेन्सेट आणि इतर द्रवपदार्थांसह उत्पादन करतो. काही वर्षांपूर्वी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी इराणवर निर्बंध लादले होते, परंतु त्यांनी खर्ग बेटांवर हल्ला करण्याचे आदेश दिले नव्हते. कार्टर यांच्यापाठोपाठ, राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८०च्या दशकात इराण-इराक टँकर युद्धादरम्यान जहाज सुरक्षेला प्राधान्य दिले होते. तेव्हाही इराणी जहाजे आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य केले होते, परंतु खर्ग बेटाला धक्का लावला नव्हता. कारण हे बेट इराणच्या सर्वात मोठ्या तेल क्षेत्रांमधून पाइपलाइनद्वारे येणारे तेल गोळा करते.

इराणने वाढवलेली निर्यात खटकली?

अमेरिकी इस्रायलने हल्ला करण्याच्या काही दिवस आधी, इराणने खर्ग बेटांवरून तेल निर्यात विक्रमी पातळीवर वाढवली. जेपी मॉर्गनच्या मते, १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान इराणने दररोज ३ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल भरले, जे त्याच्या सामान्य निर्यात पातळीच्या १.३ ते १.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिनच्या जवळजवळ तिप्पट होते. ही गोष्ट खटकल्याने कदाचित अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

Web Title : ईरान के खर्ग द्वीप पर अमेरिकी मिसाइल हमला: तेल केंद्र निशाने पर?

Web Summary : अमेरिकी सेना ने कथित तौर पर ईरान के खर्ग द्वीप पर हमला किया, तेल निर्यात सुविधाओं के पास सैन्य ठिकानों को निशाना बनाया। राष्ट्रपति ट्रम्प ने हमलों का एक वीडियो जारी किया, जिसमें होर्मुज जलडमरूमध्य में शिपिंग को बाधित करने के खिलाफ चेतावनी दी गई है। ईरान के बढ़े हुए तेल निर्यात ने कार्रवाई को ट्रिगर किया होगा।

Web Title : US Missile Attack on Iran's Kharg Island: Oil Hub Hit?

Web Summary : US forces reportedly attacked Iran's Kharg Island, targeting military bases near oil export facilities. President Trump released a video of the strikes, warning against disrupting Hormuz Strait shipping. Iran's increased oil exports may have triggered the action.