"इराण मान गया...!"; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:56 IST2026-03-25T11:53:03+5:302026-03-25T11:56:20+5:30

मार्कवेन मुलीन यांनी हे अमेरिकेचे नवे गृह सुरक्षा सचिव झाले आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर, ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अधिक माहिती उघड करणे योग्य नाही.

Iran has accepted America won the war, received a valuable gift Trump's big claim | "इराण मान गया...!"; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा

"इराण मान गया...!"; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले असल्याचा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला. गेल्या तीन आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे. दरम्यान आता, इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्यावर पूर्णपणे सहमती दर्शवली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, इराणने अमेरिकेला होर्मुजच्या सामुद्रधुनीशी संबंधित तेल आणि गॅससंदर्भात एक अत्यंत 'मौल्यवान गिफ्ट' दिले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ते ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

ट्रम्प म्हणाले, "इराण तडजोडीसाठी तयार झाला आहे. या वाटाघाटींचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर करत आहेत, असे संकेतही त्यांनी दिले. "इराणच्या नेतृत्वात आधीच मोठे बदल झाले आहेत, असे म्हणत, हे 'सत्तापालट' असल्याचेही ते म्हणाले. इराणचे नवीन नेते अगदी वेगळे आहेत. जे, पूर्वी या समस्येचे कारण बनले होते.

काय आहे इराणचं 'स्पेशल गिफ्ट'? -
मार्कवेन मुलीन यांनी हे अमेरिकेचे नवे गृह सुरक्षा सचिव झाले आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर, ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अधिक माहिती उघड करणे योग्य नाही. मात्र, इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगणार नाही, असे मान्य केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणी नेतृत्वाने अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनी आणि तेल पुरवठ्याशी संबंधित एक मौल्यवान भेट दिली आहे. आपण एक करार करणार आहोत. त्यांनी काल आम्हाला एक खास भेट दिली. ती एक खूप मोठी आणि मौल्यवान भेट होती. ती भेट काय होती हे आपण सांगणार नाही, पण ती तेल आणि गॅसशी संबंधित होती."

तत्पूर्वी, ट्रम्प यांनी, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अधिक सुविधाजनक केल्याबद्दल, पाकिस्तानचे पंतप्रधन शहबाज शरीफ यांच्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन केले. शरीफ यांनी सुरू असलेल्या संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी चर्चा आयोजित करण्याचा प्रस्तावही दिला.

Web Title : ईरान माना! ट्रम्प का दावा, अमेरिका ने युद्ध जीता, मिला 'कीमती तोहफा'.

Web Summary : ट्रम्प का दावा है कि अमेरिका ने ईरान पर जीत हासिल की; ईरान परमाणु हथियार नहीं बनाएगा। ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य से संबंधित 'कीमती' तेल/गैस संपत्ति भेंट की। ईरान में नेतृत्व परिवर्तन हुआ है।

Web Title : Iran Yielded! Trump Claims US Won War, Received 'Valuable Gift'.

Web Summary : Trump claims US won against Iran; Iran agreed to no nuclear weapons. Iran also gifted a 'valuable' oil/gas related asset regarding the Strait of Hormuz. Negotiations are underway, and leadership changes occurred in Iran.