इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 07:46 IST2026-03-24T07:45:40+5:302026-03-24T07:46:28+5:30

Iran Gas Grid Attack News: युद्ध पेटले! इराणच्या गॅस ग्रिडवर भीषण हल्ला, कुवैतमध्ये 'ब्लॅकआउट'; ट्रम्प यांनी केला इराण युद्धाच्या 'मास्टरमाइंड'चा खुलासा

Iran Gas Grid Attack News: Israel got out of hand! Despite Trump's words, it attacked Iran's power plants; later Kuwait was also plunged into darkness... | इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

मध्य पूर्वेतील युद्ध दिवसांसाठी थांबविण्याची घोषणा होत नाही तोच इस्रायलने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांना तोंडघशी पाडले आहे. इस्रायलने आपली मनमानी सुरुच ठेवत इराणच्या गॅस ग्रीड आणि पावर स्टेशनवर मोठा हल्ला केला आहे. यामुळे युद्धबंदी होत असल्याचे दिसत असताना आता पुन्हा हे युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ट्रम्प यांच्या शांतता चर्चेच्या संकेतानंतरही इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर मोठे हल्ले झाले असून, याचे पडसाद शेजारील कुवैतमध्येही उमटले आहेत. इराणच्या गॅस ग्रिड आणि पॉवर स्टेशनला लक्ष्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान इराणच्या खुर्रमशहर आणि इस्फहान या दोन औद्योगिक शहरांवर भीषण हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये इराणचे गॅस सप्लाय नेटवर्क आणि पॉवर ग्रीडचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे खुर्रमशहर पॉवर स्टेशनची वीज निर्मिती क्षमता पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्फोट इतके भीषण होते की लांबवरून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. इस्रायलने अशाचपद्धतीने गाझा सीझफायरवेळी ट्रम्प यांचा शब्द मोडला होता.

कुवैतमध्ये 'ब्लॅकआउट' आणि मलब्याचा पाऊस
इराण युद्धाची झळ आता शेजारील देशांनाही बसू लागली आहे. कुवैतच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडताना पडलेल्या ढिगाऱ्यामुळे हाय-व्होल्टेज वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे कुवैतच्या अनेक भागांत मंगळवारी पहाटेपासूनच वीजपुरवठा खंडित झाला असून 'ब्लॅकआउट'ची स्थिती निर्माण झाली आहे.

इराण युद्धाचा 'मास्टरमाइंड' कोण? ट्रम्प यांचा गौप्यस्फोट
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाच्या सुरुवातीमागील पडद्यामागची कथा सांगितली. ट्रम्प यांनी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याकडे बोट दाखवत म्हटले की, "पीटर, मला वाटते तुम्हीच पहिले व्यक्ती होतात ज्यांनी 'चला, हे (हल्ला) करूया' असे म्हटले होते." ट्रम्प यांच्या या विधानामुळे हेगसेथ हेच या युद्धाचे खरे 'मास्टरमाइंड' असल्याचे समोर आले आहे.

इटलीचा गॅससाठी संघर्ष
कतारने 'फोर्स मेज्योर' लागू करून गॅस पुरवठा थांबवल्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणीबाणीच्या प्रवासासाठी अल्जीरियाला रवाना होत आहेत. मेलोनी यांनी देशाची गरज भागविण्यासाठी सोय करावी लागणार आहे. 

Web Title : ट्रम्प को दरकिनार कर इजरायल ने ईरान पर हमला किया; कुवैत में बिजली गुल।

Web Summary : ट्रम्प को अनदेखा करते हुए, इजरायल ने ईरानी गैस और बिजली सुविधाओं पर हमला किया, जिससे कुवैत प्रभावित हुआ। हमले शांति वार्ता के संकेतों के बाद हुए। ट्रम्प ने अमेरिकी भागीदारी का संकेत दिया। कतर की आपूर्ति रोकने के बाद इटली गैस की तलाश में है।

Web Title : Israel defies Trump, attacks Iran; Kuwait faces blackout.

Web Summary : Ignoring Trump, Israel struck Iranian gas and power facilities, impacting Kuwait. The attacks followed peace talk signals. Trump hinted at US involvement. Italy seeks gas after Qatar's supply halt.