इराणला थेट अमेरिकेतून कोणाचे मेसेजेस येतात? परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे चर्चेचा दरवाजा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:32 IST2026-04-01T10:31:39+5:302026-04-01T10:32:29+5:30

अमेरिकेकडून इराणला थेट मेसेजेस येत असल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला आहे. स्टीव्ह विटकॉफ यांच्याकडून मिळणाऱ्या संदेशांमागील सत्य काय?

iran foreign minister abbas araghchi reveals direct messages from us steve witkoff war updates | इराणला थेट अमेरिकेतून कोणाचे मेसेजेस येतात? परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे चर्चेचा दरवाजा बंद!

इराणला थेट अमेरिकेतून कोणाचे मेसेजेस येतात? परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; 'या' कारणामुळे चर्चेचा दरवाजा बंद!

पश्चिम आशियातील युद्धाचा भडका उडालेला असतानाच आता जागतिक राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पडद्यामागे काहीतरी शिजतंय का? असा प्रश्न विचारला जात असतानाच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. "आम्हाला अमेरिकेकडून थेट मेसेजेस येत आहेत," असे सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, हे मेसेजेस म्हणजे चर्चा नव्हे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

कोणाकडून येतायत मेसेजेस?

'अल जझीरा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अराघची यांनी सांगितले की, त्यांना अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांच्याकडून सतत संदेश मिळत आहेत. "मला विटकॉफ यांच्याकडून मेसेजेस येत आहेत हे खरे आहे, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही अमेरिकेशी चर्चा करत आहोत. अमेरिकेने आम्हाला १५ कलमी प्रस्ताव दिला असल्याचा दावा केला जात आहे, मात्र आम्ही त्या प्रस्तावावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही किंवा कोणतीही अट ठेवलेली नाही," असे अराघची यांनी स्पष्ट केले.

"आमचा अनुभव चांगला नाही!"

अमेरिकेसोबतच्या चर्चेबाबत इराणचा दृष्टिकोन नकारात्मक का आहे, याचे कारण सांगताना परराष्ट्र मंत्र्यांनी जुन्या जखमांवर बोट ठेवले. ते म्हणाले, "अमेरिकेसोबत चर्चा करण्याचा आमचा अनुभव कधीच चांगला राहिला नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही एक करार केला होता, पण अमेरिका त्यातून मधूनच बाहेर पडली. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्या जे काही संदेशांचे दळणवळण सुरू आहे, ते केवळ अधिकृत परराष्ट्र मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातूनच होत आहे."

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा: दोन आठवड्यात युद्ध संपणार?

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत मोठे विधान केले आहे. "इराणसोबतचे युद्ध येत्या दोन ते तीन आठवड्यांत संपेल," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, "युद्ध संपवण्यासाठी आता कोणत्याही कराराची गरज उरलेली नाही. आमचे मुख्य उद्दिष्ट इराणला अण्वस्त्रांपासून रोखणे हे होते आणि ते आता पूर्ण झाले आहे. त्यांच्याकडे आता अण्वस्त्रे नाहीत. कदाचित पुढच्या काही दिवसांतच हे प्रकरण पूर्णपणे मार्गी लागेल."

इराणची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता!

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनीही या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही युद्ध ओढू इच्छित नाही. इराण शांततेसाठी तयार आहे, पण आमच्या देशाची सुरक्षा आणि भविष्यातील हल्ल्यांपासून मिळणारी हमी यावर आम्ही तडजोड करणार नाही. इराणच्या जनतेच्या हिताचे रक्षण झाल्याशिवाय कोणताही समझोता मान्य केला जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : ईरान को अमेरिका से संदेश; विदेश मंत्री का खुलासा, बातचीत नहीं

Web Summary : ईरान के विदेश मंत्री ने अमेरिका से सीधे संदेश मिलने का खुलासा किया, जो प्रतिनिधि स्टीव विटकॉफ द्वारा भेजे गए थे। हालांकि, उन्होंने स्पष्ट किया कि ये संदेश सक्रिय बातचीत का प्रतिनिधित्व नहीं करते हैं। ईरान को अमेरिका पर अतीत में संधि तोड़ने के कारण अविश्वास है। ट्रंप का दावा है कि ईरान युद्ध जल्द ही खत्म हो जाएगा।

Web Title : Iran receives messages from US; No talks: Foreign Minister reveals

Web Summary : Iran's Foreign Minister disclosed receiving messages directly from the US, conveyed by representative Steve Witkoff. However, he clarified these messages do not represent active negotiations. Iran distrusts America due to past treaty withdrawals. Trump claims Iran war will end soon.