तुर्कीत NATO ने मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब साठवून ठेवलेले; इराणने त्याच ठिकाणावर केला हल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:02 IST2026-03-13T12:02:49+5:302026-03-13T12:02:57+5:30

Iran Crisis: मध्यपूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता तीव्र रूप घेतले आहे.

Iran Crisis: NATO stored a large number of nuclear bombs in Turkey; Iran attacked the same place | तुर्कीत NATO ने मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब साठवून ठेवलेले; इराणने त्याच ठिकाणावर केला हल्ला...

तुर्कीत NATO ने मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब साठवून ठेवलेले; इराणने त्याच ठिकाणावर केला हल्ला...

Iran Crisis: मध्यपूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता तीव्र रूप घेतले आहे. ताज्या घडामोडीत इराणने तुर्कीमधील NATO च्या इन्सर्लिक (Incirlik) एअरबेसवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या एअरबेसवर अमेरिकेची मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे साठवून ठेवल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने, या घटनेला आंतरराष्ट्रीय महत्व निर्माण झाले आहे.

अणुबॉम्ब साठ्यामुळे भीती वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीतील अदाना शहराजवळ असलेल्या NATO च्या इन्सर्लिक एअरबेसवर अमेरिकेने NATO कराराअंतर्गत अंदाजे ५० अणुबॉम्ब साठवून ठेवल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे इराणने या ठिकाणाला लक्ष्य केल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

सायरन आणि स्फोटांचे आवाज

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था AFP च्या माहितीनुसार, या एअरबेसवर अचानक सायरन वाजू लागले. स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ३:२५ वाजता सायरन वाजल्याची नोंद आहे. हे सायरन जवळपास पाच मिनिटे सुरू होते. या घटनेनंतर एअरबेसवर तातडीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला.

दरम्यान, परिसरात काही काळ स्फोटांचे आवाज आणि अग्नीशमन, तसेच सुरक्षा दलांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आल्याची माहिती स्थानिक स्रोतांकडून देण्यात आली आहे. काही अहवालांनुसार, हल्ला करणारी क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन NATO च्या संरक्षण प्रणालीने इंटरसेप्ट केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

या घटनेनंतर तुर्की सरकारकडून किंवा NATO कडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे हल्ल्याचे अचूक स्वरूप आणि त्यातून झालेले नुकसान याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही.

आधीही मिसाइल पाडली होती

याआधी ४ मार्च रोजी इराणकडून डागण्यात आलेली एक मिसाइल तुर्कीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर NATO च्या संरक्षण यंत्रणेद्वारे पाडण्यात आली होती. त्यामुळे या भागातील तणाव आधीच वाढलेला होता.

मिडल ईस्टमध्ये संघर्ष तीव्र

मिडल ईस्टमध्ये सध्या संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. इराणने खाडी देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. इराकमधील फ्रान्सच्या लष्करी तळालाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, इराणच्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानसह इराणमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. तसेच इस्त्रायलने लेबनानमधील काही भागांवरही जोरदार बॉम्बहल्ले केल्याचे वृत्त आहे.

Web Title: Iran Crisis: NATO stored a large number of nuclear bombs in Turkey; Iran attacked the same place