युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 06:39 IST2026-04-04T06:38:48+5:302026-04-04T06:39:50+5:30

आखाती देशांवर इराणकडून हल्ल्याची शक्यता

Iran Claims US Stealth Fighter Shot Down Pilot Captured | युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले

युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले

दुबई: अमेरिकेचे अत्याधुनिक स्टेल्थ फायटर विमान मध्य इराणमध्ये पाडल्याची काही छायाचित्रे इराणच्या सरकारी माध्यमांनी शुक्रवारी प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली. या फायटर विमानातील वैमानिकाला ताब्यात घेतल्याचा दावा इराणने केला जात आहे. वैमानिकाला शोधण्यासाठी अमेरिकेने शोधमोहीम सुरू केली आहे.

हे विमान नेमके कोणते होते याची पुष्टी होऊ शकली नाही. छायाचित्रांतील अवशेष हे एफ-१५ ईगल या जुन्या प्रकारच्या अमेरिकेच्या लढाऊ विमानाशी जुळतात असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. उदाहरणार्थ, एका तुकड्यावर 'यूएस एअर फोर्सेस इन युरोप' असा लोगो दिसतो. काही परदेशी वृत्तसंस्थांनी अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार इराणने अमेरिकेचे एफ-३५ विमान पाडल्याचे म्हटले आहे. 

कुवेतचा तेल, जल शुद्धीकरण प्रकल्प लक्ष्य 

शुक्रवारी कुवेतमधील मीना अल-अहमदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणी ड्रोन हल्ले झाले. या हल्ल्यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आग लागली. कुवेत पेट्रोलियम कॉपॅर्पोरेशनने सांगितले की, युद्ध सुरू झाल्यानंतरचा हा तिसरा हल्ला असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इराणने कुवेतमधील एका जलशुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला केला. दरम्यान इस्रायल, बहरिन व कुवेतने त्यांच्या काही भागांवर इराणकडून मोठे हल्ले होणार असल्याचा इशारा आपल्या नागरिकांना दिला आहे तर अमेरिका मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे.

इराणमधील ३५ हजार कोटी रुपयांचा उंच पूल अमेरिकेने केला उद्ध्वस्त

तेहरान : इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक कराज बीप पूल अमेरिकेने बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त केला. या हल्ल्यांत ८ नागरिक ठार व २५ जण जखमी झाले असून तेहरान व कराज या दोन शहरांना जोडणारा हा देशातील सर्वात उंच व मोठा पूल होता. हा पूल पश्चिम तेहरानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे. हा पूल लांबीने १,०५० मीटर आणि उंचीने १३६ मीटर इतका असून, तो मध्य-पूर्वेतील सर्वात उंच पूल मानला जात होता.

Web Title : युद्ध गहराया: ईरान ने गिराया अमेरिकी विमान, इस्राइल का ईरानी शहरों पर हमला

Web Summary : ईरान ने एक अमेरिकी लड़ाकू विमान को गिराने का दावा किया, जिसके बाद तनाव बढ़ गया। इस्राइल ने तेहरान और इस्फ़हान पर जवाबी हमले किए। कुवैत की तेल सुविधाओं पर ईरानी ड्रोन हमले हुए, जिससे क्षेत्रीय संघर्ष बढ़ गया। अमेरिका ने एक प्रमुख ईरानी पुल को नष्ट कर दिया, जिसमें कई लोगों की मौत हो गई।

Web Title : War Escalates: Iran Downed US Plane, Israel Strikes Iranian Cities

Web Summary : Tensions soar as Iran claims to have downed a US fighter plane. Israel retaliates with strikes on Tehran and Isfahan. Kuwait's oil facilities face Iranian drone attacks, escalating regional conflict. A major Iranian bridge was destroyed by a US bombing, resulting in multiple deaths and injuries.