एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:39 IST2026-03-26T09:36:34+5:302026-03-26T09:39:49+5:30

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत शक्तीशाली मानले जाणारे F-18 फायटर जेट क्षेपणास्त्राने पाडल्याचा खळबळजनक दावा केला होता.

Iran claims to have shot down an F-18 fighter jet, showing a video; America immediately responded! Said, 'This is..' | एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..' 

एफ १८ फायटर जेट पाडलं, व्हिडिओ दाखवत इराणचा दावा; अमेरिकेने लगेचच दिलं उत्तर! म्हणाले, 'ही तर..' 

मध्यपूर्वेतील धुमसता संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत शक्तीशाली मानले जाणारे F-18 फायटर जेट क्षेपणास्त्राने पाडल्याचा खळबळजनक दावा केला होता. विशेष म्हणजे, या दाव्याला पुष्टी देण्यासाठी इराणने एक व्हिडिओ देखील जारी केला. मात्र, अमेरिकेने इराणचा हा दावा साफ फेटाळून लावत, ही केवळ फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

इराणच्या 'प्रेस टीव्ही'ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये इराणची एअर डिफेन्स सिस्टीम एका विमानाला लक्ष्य करताना आणि त्यानंतर ते विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित होऊन कोसळताना दिसत आहे. चाबहारच्या आकाशात ही कारवाई केल्याचे इराणचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "इराणचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे. आमचे कोणतेही विमान पाडलेले नाही आणि सर्व वैमानिक सुरक्षित आहेत."

शांतता प्रस्ताव केराच्या टोपलीत!

हा वाद तेव्हा अधिक गडद झाला जेव्हा इराणने अमेरिकेने दिलेला सीजफायर म्हणजेच युद्धविराम करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून चर्चेची तयारी दर्शवण्यात आली होती, मात्र इराणने आपल्या अटींवर ठाम राहत हा प्रस्ताव धुडकावला आहे. यामुळे चिडलेल्या अमेरिकेने आता इराणच्या दिशेने अधिक सैन्य रवाना करण्याचा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी इराणला कडक शब्दांत ताकीद दिली आहे. "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विनोद करत नाहीत. जर इराणने हल्ले थांबवले नाहीत, तर त्यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा तडाखा दिला जाईल," असा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिकेने आता ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे १००० सैनिक आणि सुमारे ५००० मरीन सैनिकांना युद्धभूमीवर तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : ईरान का अमेरिकी जेट गिराने का दावा; अमेरिका ने नकारा, बताया झूठी खबर।

Web Summary : ईरान ने अमेरिकी एफ-18 को मार गिराने का दावा किया, वीडियो जारी किया। अमेरिका ने दावे को खारिज करते हुए झूठा बताया। युद्धविराम वार्ता विफल होने और अमेरिका द्वारा ईरानी हमलों पर गंभीर परिणाम की धमकी देने से तनाव बढ़ गया, अधिक सैनिक तैनात।

Web Title : Iran claims downing US jet; America denies, calls it fake news.

Web Summary : Iran claimed it shot down a US F-18, releasing video evidence. The US refuted the claim, calling it false. Tensions escalate as ceasefire talks fail and the US threatens severe consequences for further Iranian attacks, deploying more troops.