अमेरिकेला झटका देण्यासाठी इराणने बदलले टारगेट! दिला शेवटचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:41 IST2026-03-27T15:16:30+5:302026-03-27T15:41:34+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० दिवसांसाठी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचे आश्वासन दिले, पण इराणला या आश्वासनाबद्दल स्पष्टपणे खात्री नाही. पश्चिम आशियातील ज्या ठिकाणी अमेरिकी सैन्य थांबले आहेत त्या ठिकाणी लक्ष्य करणार असे इराणने सांगितले.

Iran changes target to strike America Last warning | अमेरिकेला झटका देण्यासाठी इराणने बदलले टारगेट! दिला शेवटचा इशारा

अमेरिकेला झटका देण्यासाठी इराणने बदलले टारगेट! दिला शेवटचा इशारा

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध पाच दिवस थांबवल्याचे जाहीर केले. पण, इराण हे युद्ध थांबवण्याची कोणतीही चिन्हे दाखवत नाही. पश्चिम आशियातील ज्या हॉटेल्समध्ये अमेरिकन सैनिक थांबले आहेत, त्यांना आता लक्ष्य केले जाईल, असे इराणने म्हटले आहे.'या प्रदेशातील ज्या हॉटेल्समध्ये अमेरिकन सैनिक थांबले आहेत, त्यांना युद्धात लक्ष्य केले जाईल आणि प्रत्येक हॉटेलवर हल्ला केला जाईल, असा इराणी लष्कराने इशारा दिला आहे. इराणने पश्चिम आशियाई देशांमधील हॉटेल मालकांना त्यांच्या हॉटेल्समध्ये अमेरिकन सैनिकांना राहू न देण्याचा अंतिम इशारा दिला आहे.

नेपाळमध्ये 'रॅपर राज': बालेन शाह बनले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान; 'जेन-झी' क्रांतीनं जुनी सत्ता उलथवली

गुरुवारी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकी सैन्यावर आखाती सहकार्य परिषद देशांतील लोकांना 'मानवी ढाल' म्हणून वापरत असल्याचा आरोप केला. या युद्धाच्या सुरुवातीपासून, अमेरिकी सैनिक GCC मधील त्यांच्या लष्करी तळांवरून पळून हॉटेल्स आणि कार्यालयांमध्ये लपले आहेत, असे त्यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये म्हटले.

त्यांनी परिसरातील हॉटेल्सना त्यांना बुकिंग न देण्याचे आवाहन केले. इराणने संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनमधील हॉटेल्ससह परिसरातील हॉटेल्सना कडक इशारा दिला आहे.

"ज्यावेळी सर्व अमेरिकन सैन्य एका हॉटेलमध्ये जाते, तेव्हा आमच्या दृष्टिकोनातून ते हॉटेल 'अमेरिकन' बनते," असे इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफझल शेकरची यांनी गुरुवारी सरकारी दूरचित्रवाणीवर सांगितले. आपण नुसतेच स्वस्थ बसून अमेरिकनांना आपल्यावर हल्ला करू द्यायचा का? जेव्हा आम्ही प्रत्युत्तर देऊ, तेव्हा साहजिकच ते जिथे असतील तिथेच आम्हाला हल्ला करावा लागेल, असेही इराकडून सांगण्यात आले आहे.

सीरिया, लेबनॉन, जिबूती यांना अल्टीमेटम

इराणच्या लष्कराने सीरिया, लेबनॉन आणि जिबूतीमध्ये अमेरिकी सैन्य अशाच प्रकारच्या ठिकाणांचा वापर करत असल्याचे ओळखले आहे. इराणने आपल्या शेजारी देशांवर अमेरिकी सैन्याला त्यांच्या भूमीवरून हल्ले करण्याची परवानगी दिल्याचा आरोप केला आहे, जे आरोप आखाती देशांनी वारंवार नाकारले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यांनी हे स्पष्ट केले होते की, ते इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या भूमीचा किंवा हवाई क्षेत्राचा वापर होऊ देणार नाहीत.

Web Title : ईरान की अमेरिका को धमकी: मध्य पूर्व में अमेरिकी सैनिकों वाले होटलों को निशाना बनाएगा

Web Summary : ईरान ने मध्य पूर्व में अमेरिकी सैनिकों वाले होटलों को निशाना बनाने की धमकी दी है, और अमेरिका पर नागरिकों को ढाल के रूप में इस्तेमाल करने का आरोप लगाया है। उन्होंने होटलों से अमेरिकी सैनिकों को आवास न देने का आग्रह किया और सीरिया, लेबनान और जिबूती को चेतावनी जारी की, जिसमें आरोप लगाया गया कि ये राष्ट्र अपनी धरती से हमलों की अनुमति देते हैं।

Web Title : Iran Threatens US: Targets Hotels Hosting American Soldiers in Middle East

Web Summary : Iran warned it would target hotels housing US soldiers in the Middle East, accusing America of using civilians as shields. They urged hotels not to accommodate American troops, issuing ultimatums to Syria, Lebanon, and Djibouti, alleging these nations allow attacks from their soil.