इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:33 IST2026-04-03T08:30:59+5:302026-04-03T08:33:06+5:30

अमेरिकेने इराणमधील करज भागातील मोठा पूल उद्ध्वस्त केला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तडजोड करण्याची धमकी दिली आहे.

iran biggest bridge destroyed donald trump warning hormuz strait crisis marathi news | इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू"

इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू"

पश्चिम आशियातील युद्धाने आता अतिशय भयानक वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील 'करज' भागातील एका महाकाय पुलावर झालेल्या भीषण हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत जगाला हादरवून सोडले आहे. "इराणने वेळेत तडजोड करावी, अन्यथा परिस्थिती यापेक्षाही भीषण होईल," असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या हल्ल्यामुळे इराणची दळणवळण यंत्रणा कोलमडली असून ट्रम्प यांनी याला इराणवरील दबावाचे सर्वात मोठे शस्त्र बनवले आहे.

इराणचा प्रतिवार: "हा तर मानवतेविरुद्धचा गुन्हा"

ट्रम्प यांच्या या धमकीला इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "पूल उद्ध्वस्त करणे समजू शकते, पण रुग्णालये, औषध कंपन्या आणि मेडिकल रिसर्च सेंटर्सवर हल्ले करण्याचा काय अर्थ? हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे," अशा शब्दांत पेजेश्कियान यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि रेड क्रॉस सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यांनी इस्रायल हादरले

एकीकडे अमेरिका हल्ले करत असताना इराणनेही माघार घेतलेली नाही. गुरुवारी इराणने इस्रायल आणि खाडीतील अरब देशांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. ट्रम्प यांनी 'इराणचा धोका संपला आहे' असा दावा केला असतानाच, इराणने या हल्ल्यांमधून आपली शक्ती अजूनही शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे. या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत.

होर्मुझचा तिढा आणि ३० देशांची बैठक

जगातील २० टक्के तेल पुरवठा होणाऱ्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर सध्या इराणचे नियंत्रण आहे. हा मार्ग मोकळा करण्यासाठी ब्रिटन आता ३० हून अधिक देशांसोबत चर्चा करण्याची योजना आखत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, होर्मुझचा मार्ग बळाचा वापर करून उघडला जाऊ शकतो, पण हे काम केवळ अमेरिकेचे नाही. ज्या देशांना तेल हवे आहे, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा मार्ग ताब्यात घ्यावा, असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.

इराणची छुप्या शस्त्रांची धमकी

अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर इराणच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम जुल्फिकारी यांनी मोठे विधान केले आहे. "अमेरिकेने ज्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे, ती आमच्यासाठी फारशी महत्त्वाची नाहीत. आमची खरी रणनीतिक शस्त्रे आणि उत्पादन केंद्रे अशा ठिकाणी आहेत, ज्याची अमेरिकेला कल्पनाही नाही आणि तिथे ते कधीही पोहोचू शकणार नाहीत," असे आव्हान जुल्फिकारी यांनी दिले आहे.

Web Title : ईरान का पुल ध्वस्त; ट्रम्प की चेतावनी: समझौता करो, वरना बुरा होगा।

Web Summary : ट्रम्प ने ईरानी पुल पर हमले का वीडियो साझा किया, चेतावनी दी कि अगर ईरान बातचीत नहीं करता है तो और बढ़ेगा। ईरान ने हमलों की निंदा की, और इजरायल, खाड़ी देशों पर मिसाइल दागी। तेल आपूर्ति मार्गों पर तनाव बढ़ा।

Web Title : Iran's bridge destroyed; Trump warns: Deal now, or face worse.

Web Summary : Trump shared a video of an Iranian bridge attack, warning of further escalation if Iran doesn't negotiate. Iran condemned the attacks, while launching missile strikes on Israel and Gulf states. Tensions rise over oil supply routes.