'खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत मोजावी लागेल', इराणचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 18:08 IST2026-03-08T18:08:25+5:302026-03-08T18:08:50+5:30

Iran-America : 'इराण बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.'

Iran-America: 'We will avenge Khamenei's assassination, Trump will have to pay the price', Iran's direct warning | 'खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत मोजावी लागेल', इराणचा थेट इशारा

'खामेनेईंच्या हत्येचा बदला घेणार; डोनाल्ड ट्रम्प यांना किंमत मोजावी लागेल', इराणचा थेट इशारा

Iran-America : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचs वरिष्ठ नेते आणि सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येची किंमत ट्रम्प यांना चुकवावी लागेल, असे त्यांनी म्हटले. मात्र ट्रम्प यांनी या धमक्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्यांना काहीही फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली.

इराण बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

इराणच्या सरकारी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अली लारीजानी म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांना सोडणार नाही. खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण कटिबद्ध आहे. ट्रम्प यांनी इराणच्या प्रतिक्रियेचा चुकीचा अंदाज लावला आहे. हे युद्ध इतक्या लवकर संपणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय, लारीजानी यांनी आरोप केला की, ट्रम्प यांना वाटले होते की, इराणमध्ये परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल, मात्र आता ते स्वतःच अडचणीत सापडले आहेत.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लारीजानी यांच्या इशाऱ्यांना फेटाळून लावले. मला माहीतही नाही की, ते कोण आहेत आणि ते काय बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याने मला काहीही फरक पडत नाही. इराण आधीच हरलेला आहे. अमेरिकेची लष्करी कारवाई सुरूच राहील आणि इराणने कोणत्याही अटींशिवाय शरणागती पत्करावी, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता वाढली आहे.

Web Title : खामenei की हत्या का बदला लेगा ईरान; ट्रम्प को चुकानी होगी कीमत।

Web Summary : ईरान ने खामenei की हत्या का बदला लेने की कसम खाई; ट्रम्प को कीमत चुकानी होगी। ट्रम्प ने धमकी को खारिज करते हुए कहा कि इससे उन पर कोई असर नहीं पड़ेगा और ईरान बिना शर्त आत्मसमर्पण करे। मध्य पूर्व में तनाव बढ़ा।

Web Title : Iran vows revenge for Khamenei's killing; Trump to pay price.

Web Summary : Iran warns Trump will pay for Khamenei's assassination. Trump dismisses the threat, stating it doesn't affect him and demands Iran's unconditional surrender. Tensions escalate in the Middle East.