WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 24, 2020 02:20 PM2020-11-24T14:20:11+5:302020-11-24T14:28:08+5:30

जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

international coronavirus WHO team to visit China soon; Death toll rises to 10,000 in one week in america | WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

Next
ठळक मुद्देजागतीक आरोग्य संघटना अर्थात WHOने तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा विचार केला आहे.ही टीम तेथे कोरोनाव्हायरस नेमका कशामुळे आणि कसा पसरला? याचा तपास करेल.संक्रमणामुळे होत असलेल्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यास अमेरिकेला अद्यापही यश आलेले नाही.

वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. www.worldometers.info/coronavirus यांच्यानुसार, जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या जगभरात 1.69 कोटी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जागतीक आरोग्य संघटना अर्थात WHOने अनेक महिने टाळाटाळ केल्यानंतर, आता तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा विचार केला आहे. ही टीम तेथे कोरोनाव्हायरस नेमका कशामुळे आणि कसा पसरला? याचा तपास करेल. तर दुसरीकडे अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे मरणारांचा आकडा 10 हजारच्याही पुढे गेला आहे.

WHOचा  निर्णय -
WHOने सोमवारी रात्री सांगितले, की त्यांनी जगातील आरोग्य तज्ज्ञ आणि संक्रमक आजारांच्या तज्ज्ञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. AFPने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये व्हायरस कसा पसरला? या व्हायरसचा मुख्य सोर्स काय होता? हा आजार कुण्या प्राण्यापासून मानवात पसरला, की आणखी काही कारण आहे? यासंदर्भात ही टीम तपास करेल. संघटनेचे इमरजन्सी डायरेक्टर मायकल रायन म्हणाले, "आम्हाला पूर्ण आशा आहे, की चीन सरकार या टीमला पूर्ण सुविधा पुरवणार आहे. या टीममध्ये चीनच्या तज्ज्ञांचाही समावेश असेल.

तत्पूर्वी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सातत्याने आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते, की  कोरोना व्हायरस हा चीनमधील लॅबमधूनच पसरला. वेळ आली, की आपण हे आरोपही सिद्ध करू. मात्र त्यांना अद्यापही कसल्याही प्रारचे पुरावे देता आलेले नहीत. तर संघटनेने म्हटले आहे, या व्हायरसने एवढे विक्राळ रूप कसे धारण केले, हे जगाला माहित होणे आवश्यक आहे.

अमेरिका पुन्हा बेहाल -
‘द गार्डियन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या आठवड्यात जवळपास 10 हजार जणांचा मृत्यू झाला. संक्रमणामुळे होत असलेल्या मृत्यूंवर नियंत्रण मिळविण्यास अमेरिकेला अद्यापही यश आलेले नाही. येथे रोजच्या रोज जवळपास सरासरी दीड लाख रुग्ण आढळत आहेत. अमेरिकन सरकारने नागरिकांना आवाहन केले होते, की त्यांनी थँक्सगिव्हिंग सप्ताहात ट्रॅव्हलिंग टाळावी. मात्र, सरकारने केलेल्या आवाहनाचा कसलाही परिणाम झालेला दिसत नाही. CNNने दिलेल्या वृत्तानुसार, लाखो लोकांनी लॉन्ग ड्राइव्हवर जाण्याची तयारी केली आहे. यामुळे व्हायरस अत्यंत वेगाने पसरू शकतो. याशिवाय रुग्णालयातही बेड कमी पडण्याची शक्यता आहे.

Web Title: international coronavirus WHO team to visit China soon; Death toll rises to 10,000 in one week in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.