भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:48 IST2025-05-31T14:46:40+5:302025-05-31T14:48:57+5:30

पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले होते की, दोन्ही देशांदरम्यान २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे...

India's friend signs multi billion dollar deal with Pakistan Russia debunks Pakistani media's claim | भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल

भारताच्या मित्रानं पाकिस्तानसोबत केला अब्जावधी डॉलर्सचा करार? रशियानं केली पाक माध्यमांंच्या दाव्याची पोलखोल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला आहे. यातच, भारताचा मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तानसोबत मोठा करार केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांतून करण्यात आला होता. मात्र, रशियाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. एवढेच नाही, तर या अफावा असून आमचे भारतासोबत असलेले संबंध खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचे रशियाने म्हटले आहे. 

खरे तर, रशिया आणि पाकिस्तानने कराची येथील सोव्हिएत काळातील एक स्टील प्लांट पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी करार केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. सोव्हिएत युनियनने १९७० च्या दशकात पाकिस्तान स्टील प्लांटची रचना केली होती आणि त्याला निधी देखील दिला होता. तथापी, आता हा स्टील प्लांट पूर्णपणे भंगार झाला आहे.

पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले होते की, दोन्ही देशांदरम्यान २.६ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. तथापि, रशियाने याचे फॅक्ट चेक करून हे खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशा कुठल्याही करारांवर स्वाक्षरी केल्याच्या वृत्ताचे मॉस्कोने खंडन केले आहे.

यासंदर्भात रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने स्पष्ट केले आहे की, पाक माध्यमांनी प्रसिद्ध केलेले हे वृत्त अतिशयोक्तीपूर्ण आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तासंदर्भात बोलताना शुक्रवारी एका रशियन अधिकाऱ्याने म्हटले आहे की, 'हे भारतासोबतचे संबंध खराब करण्याची इच्छा असलेल्या कुण्या व्यक्तीने दिलेले अतिशयोक्तिपूर्ण वृत्त आहे. 

रशिया-पाकिस्तान कराराचा कसलाही पुरावा नाही -
स्पुतनिक इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 'रशिया आणि पाकिस्तान यांच्यात 2.6 अब्ज डॉलरचा करार झाल्याच्या वृत्तांत विश्वसनीय सूत्रांची कमतरता आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सचा करार झाल्याचा कसलाही पुरावा नाही.' तसेच, या दाव्यांची सुरुवात निक्केई एशियाने आपल्या वृत्तात केली होती. ज्यावर 2022 पासूनच रशियात बंदी आहे, असेही संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे.

Web Title: India's friend signs multi billion dollar deal with Pakistan Russia debunks Pakistani media's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.