'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:51 IST2025-08-25T13:51:09+5:302025-08-25T13:51:51+5:30
पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ३०० हून अधिकांचा मृत्यू झाला.

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. पहलगाम गहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. तर दुसरीकडे, आता भारताने पाकिस्तानला मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे फील्ड मार्शल आर्मी चीफ असीम मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकीही दिली होती. एवढं सगळं होऊनही भारताने पाकिस्तानला खूप मदत केली. पाकिस्तानच्या अनेक भागात पूर आला आहे, यामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताने तावी नदीतील पुराची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिली आहे.
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
भारताने पाकिस्तानला पुराबद्दल इशारा दिला
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने तावी नदीत संभाव्य पुराबद्दल पाकिस्तानला इशारा दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे.
भारताने संभाव्य पुरांबद्दल माहिती देण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये संपर्क होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारत किंवा पाकिस्तानकडून या माहितीची दिलेली नाही.सहसा, अशी माहिती सिंधू जल आयुक्तांमार्फत दिली जाते. तावी नदी जम्मूहून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वाहते.
रविवारी भारताने पुराचा इशारा दिला होता
भारताने जम्मूमधील तावी नदीत मोठ्या पुराचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने रविवारी हा इशारा दिला.
भारताने सिंधू जल करार स्थगित केला
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर, २२ एप्रिल रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली. या काळात भारताने १९६० चा सिंधू जल करार देखील स्थगित केला.