शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सीएनजी-पीएनजी पुरवठ्यावर मोठे संकट; होर्मुझ सामुद्रधुनीत तणावामुळे जहाजे अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कतारमधील जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन बंद झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कतारमधील जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे कतारकडून भारताला होणारा एलएनजी गॅसचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, देशातील औद्योगिक आणि शहरी गॅस वापरावर ४० टक्केपर्यंत कपात लादण्यात आली आहे.

‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. कतारचे ‘रास लफान’ हे मुख्य लोडिंग बंदर याच मार्गावर असल्याने भारताचे ‘पेट्रोनेट एलएनजी’चे टँकर तिथे पोहोचू शकत नाहीत. पेट्रोनेट व कतारएनर्जी या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांना ‘फोर्स मेज्योर’ ची नोटीस बजावली आहे.

पुरवठा साखळी धोक्यातभारताच्या एकूण कच्चे तेल आयातीपैकी ५० टक्के आणि एलएनजी पुरवठ्यापैकी ५४ टक्के हिस्सा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून येतो. हा मार्ग बंद झाल्याने गेल, आयओसी आणि बीपीसीएल यांसारख्या कंपन्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.२.७ कोटी टन एलएनजी भारत वर्षाला आयात करतो. त्यातील सुमारे ४० टक्के पुरवठा एकट्या कतारकडून होतो.

भारतावर परिणाम काय?

पुरवठ्यात ६०% घट : शहरी गॅस वितरण कंपन्यांच्या स्वस्त गॅस पुरवठ्यात ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

दुप्पट किमतीचा फटका : कतारच्या स्वस्त गॅसऐवजी आता आंतरराष्ट्रीय बाजारातून २५ डॉलर प्रति एमएमबीटीयू दराने महागडा गॅस खरेदी करावा लागेल.

सीएनजी-पीएनजी महागणार का? गॅसच्या किमती दुपटीने वाढल्यास सीएनजीचे दर पेट्रोलच्या जवळ पोहोचण्याची भीती आहे. यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू शकतात, असा इशारा ‘असोसिएशन ऑफ सीजीडी एंटिटीज’ने दिला आहे.

अमेरिकेत एका रात्रीतच पेट्रोलच्या दरात मोठी वाढ

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर दिसू लागला आहे. अमेरिकेत एका रात्रीत पेट्रोलच्या सरासरी दरात ११ सेंटची मोठी वाढ झाली असून, आता तिथे पेट्रोल ३.११ डॉलर प्रति गॅलनवर पोहोचले आहे. ‘अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन’ने ही माहिती दिली आहे.

इराणच्या हल्ल्यांमुळे, विशेषतः सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या वर्षभरातील उच्चांकी स्तर गाठला आहे. अमेरिकन क्रूड ऑइल ८.६ टक्क्यांनी वधारून ७७.३६ डॉलर प्रतिबॅरल झाले, तर ब्रेंट क्रूड ६.७ टक्क्यांनी वाढून ८१.२९ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले.

English
हिंदी सारांश
Web Title : India's CNG-PNG Supply Faces Crisis Amidst Hormuz Strait Tension

Web Summary : Tension in Hormuz Strait disrupts LNG supply from Qatar, impacting India. Industrial and urban gas usage faces 40% cuts. CNG-PNG prices may surge, nearing petrol costs. The crisis stems from attacks impacting energy production and tanker routes, threatening India's energy imports.
टॅग्स :Iranइराणwarयुद्ध