पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:33 PM2021-07-16T14:33:30+5:302021-07-16T14:34:15+5:30

Reuters India chief photographer Danish Siddiqui killed : दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते.

Indian photojournalist Danish Siddiqui killed in Taliban attack in Afghanistan | पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या

पुलित्झर विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या

Next
ठळक मुद्देदानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते.

काबूल - प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेता भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना चकमकीत हत्या झाली आहे. 

दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचा वृत्तांकन करत होते. दरम्यान भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये हत्या झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दानिश सिद्दीक हे 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती.

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद, ममुंडजे यांनी ट्विटरवरुन वृत्ताला दुजोरा दिला. “काल रात्री कंदाहार येथे मित्र दानिश सिद्दीकीच्या हत्येच्या दु: खद बातमीने मनापासून दु: खी झाले. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासोबत होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ”असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Web Title: Indian photojournalist Danish Siddiqui killed in Taliban attack in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.