Indian origin Colonel Raja Chari in Nasa's mission moon & Mars | ‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी
‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी

ह्यूस्टन : अमेरिकेच्या हवाई दलातील भारतीय वंशाचे कर्नल राजा जॉन वुरपुतुर चारी (४१) यांची नासाच्या आगामी चंद्र, मंगळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. २०२० मधील या मोहिमेसाठी नासाने ११ नव्या अंतराळवीरांची निवड जवळपास निश्चित केली आहे.

नासाच्या या ११ नव्या अंतराळवीरांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचे अंतराळ यात्री प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. नासाने आपल्या ‘आर्टेमिस’ कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर २०१७ मध्ये या यशस्वी अंतराळयात्रींना १८ हजार अर्जदारांमधून निवडले होते. यात चारी यांचाही समावेश होता. येथे एका कार्यक्रमात प्रत्येक अंतराळवीरांना परंपरेने दिली जाणारी चांदीची पीन देण्यात आली.

नासाचे प्रशासक जिम ब्रिडेंस्टाइनने ह्यूस्टनमध्ये बोलताना सांगितले की, २०२० मध्ये अमेरिका अंतराळयात्रींना अंतराळात पाठविणे पुन्हा सुरुवात करणार आहे. आमच्या प्रगतीचे हे एक महत्त्वाचे वर्ष असेल. अंतराळयात्री जेव्हा आपला अंतराळ प्रवास पूर्ण करतील तेव्हा त्यांना सोन्याची एक पीन देण्यात येईल. नव्या अंतराळवीरांना आयएसएस, चंद्र आणि मंगळ मोहिमांवर पाठविले जाऊ शकते. नासाच्या नियोजनानुसार महिला अंतराळयात्रीला २०२४ पर्यंत चंद्रावर पाठविण्याचा विचार आहे. चारी हे अमेरिकी हवाई दलात कर्नल आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian origin Colonel Raja Chari in Nasa's mission moon & Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.