शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त

By देवेश फडके | Published: February 17, 2021 9:20 AM

कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र काढले आहे.

ठळक मुद्देब्रिटीश संसद सदस्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबाटूलकिट प्रकरणात अटक केलेल्या दिशा रविला समर्थनभारतीय उच्चायोगाकडून खुले पत्र

लंडन : कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक परदेशातील दिग्गजांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र काढले आहे. या पत्रात परदेशी हस्तक्षेपामुळे शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही, असे म्हटले आहे. (indian high commission writes letter to british mp for supporting farmers protest)

ब्रिटीश संसदीय सदस्य क्लॉडिया यांना उत्तर देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय उच्चायोगाने म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची गैरसमजूत दूर करण्यासाठी भारतीय उच्चायोग ब्रिटीश संसदीय सदस्यांना मदत करेल. वैयक्तिक स्वार्थापोटी परदेशातील व्यक्ती शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची माहिती आणि चिथावणीखोर दावे पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, भारत सरकार यासंदर्भात अधिक जागरूकतेने काम करत आहे. यांसारखे प्रयत्न भारत सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यातील चर्चा किंवा लोकशाही पद्धतीने मार्ग काढण्यासाठीच्या प्रयत्नांवर प्रभाव पाडू शकणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे. 

'मोदी सरकारने ठाना हैं, जनता को लूटते जाना हैं', राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

ब्रिटीश संसदेच्या सदस्या क्लॉडिया वेब्बे यांनी एक ट्विट करत भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. याशिवाय ट्विटर टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवि हिला समर्थन असल्याचे सांगितले. यानंतर भारतीय उच्चायोगाने एक खुले पत्र लिहून यावर स्पष्टीकरण दिले. 

भारतात लागू करण्यात आलेले कृषी कायदे तज्ज्ञांची मते, अहवाल, समित्यांच्या शिफारसी यांच्यावर आधारित असून, गेल्या २० वर्षांपासून भारतीय कृषी क्षेत्रात असलेल्या आव्हानांचा आढावा घेतल्यानंतरच कृषी कायदे आणले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांपैकी एक छोटा गट याला विरोध करत आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संसदेत कृषी विधेयकावर विस्तृत चर्चा केल्यानंतरच याचे कायद्यात रुपांतर करून तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात आली आहे. याचा लाभ सुमारे १० कोटी छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या मुद्द्यांवर आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये ११ वेळा बैठका झाल्या असून, या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनLondonलंडन