शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अभिमानास्पद! 'नासा'च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भव्या लालची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 11:04 IST

जगातील सुप्रसिद्ध 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राची सुत्रं भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेच्या हाती देण्यात आली आहेत.

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी बातमी आहे. जगातील सुप्रसिद्ध 'नासा' (Nasa) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राची सुत्रं भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेच्या हाती देण्यात आली आहेत. भारतीय वंशाच्या डॉ. भव्या लाल यांची 'नासा'च्या प्रमुख कार्यवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ( Bhavya Lal appointed acting chief of staff of Nasa )

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी डॉ. भव्या लाल यांचं नाव निवडलं आहे. "भव्या लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा चांगला अनुभव आहे. भव्या लाल नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या सदस्य देखील राहिल्या आहेत", असं 'नासा'नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

कोण आहेत डॉ. भव्या लाल?डॉ. भव्या लाल यांनी २००५ ते २०२० पर्यंत इन्स्टिट्यूट फॉर डिफेंस अॅनालिसिस साइंस अँड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट (STPI)च्या रिसर्च स्टाफच्या सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. STPI मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या C-STPS LLC च्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. याशिवाय त्या 'केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी'च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या संचालक होत्या. अमेरिकेच्या न्यूक्लियर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं आहे.

भव्या लाल यांनी अणु विज्ञानात बीएससी आणि एमएससी पदवी प्राप्त केली आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अॅरोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही निवड झाली होती. यासोबतच तंत्रज्ञान आणि धोरण विभागातही पदवी प्राप्त केली आहे. सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात त्यांनी डॉक्टरेट केली आहे.

टॅग्स :Bhavya Lalभव्या लालNASAनासा