'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:42 IST2025-11-19T18:41:30+5:302025-11-19T18:42:11+5:30
हक यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते भारताविरुद्ध उघडपणे बोलताना दिसत आहेत.

'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे पाकिस्तानने पुन्हा एकदा मान्य केले आहे. पाकिस्तानचे नेते चौधरी अन्वरुल हक यांनी सार्वजनिकरित्या एक अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी "लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत" भारतावर हल्ला केल्याचे मान्य केले आहे.
हक यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते भारताविरुद्ध उघडपणे बोलताना दिसत आहेत. बलुचिस्तानमधील अशांततेचा संदर्भ देत त्यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. "मी आधीच सांगितले आहे की जर तुम्ही बलुचिस्तानमध्ये रक्त सांडत राहिलात, तर आम्ही भारतातील लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांना लक्ष्य करू. अल्लाहच्या कृपेने आम्ही ते केले आणि ते (भारत) अजूनही मृतदेह मोजू शकलेले नाहीत.", अशी दर्पोक्ती हक यांनी केली आहे.
हक यांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा स्पष्टपणे उल्लेख केला, ज्यात १५ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, काश्मीरच्या जंगलांचा उल्लेख करून त्यांनी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याकडे बोट दाखविले. या हल्ल्यात २६ पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते.
भारताबद्दलचे पाकिस्तानचे दावे आणि प्रत्युत्तर
पाकिस्तान वारंवार बलुचिस्तानमधील अशांततेसाठी भारताला जबाबदार ठरवतो. मात्र, भारताने हे दावे नेहमीच फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या या दहशतवादी धोरणांना उत्तर म्हणून भारताने अनेक कूटनीतिक पाऊले उचलली आहेत. यातील सर्वात मोठे पाऊल म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करण्याची भूमिका होती.