पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:08 IST2025-04-25T17:46:02+5:302025-04-25T18:08:48+5:30
India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन परदेशी आहेत.

पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचे पाणी बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानने ही युद्धाचीच घोषणा असल्याचा दावा करत अधिकारासाठी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच एलओसी मानणारा शिमला करारही निलंबित केला आहे. या हल्ल्याचा भारत बदला घेणार अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. यामुळे पाकिस्तानने रणगाडे, मिसाईल आदी शस्त्रास्त्रे सीमेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पाकिस्तान युद्धाची तयारी करू लागला आहे.
भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. पाचपैकी तीन भारतीय आहेत, तर दोन पाकिस्तानी आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात आहे. २२ मार्चला हल्ला झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाकिस्तानी लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली होती. ही त्यांची कृती नेहमीची नव्हती. तसेच भारतीय सीमेजवळून टेहळणी विमानही गेले होते. आता पाकिस्तान भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणत असल्याचे समोर येत आहे.
सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये पाकिस्तानी सैन्य सीमेवर मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे. दोन अतिरिक्त रेजिमेंट तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच टँक, चिलखती वाहने देखील मोठ्या संख्येने सीमेकडे नेली जात आहेत. लढाऊ विमाने कमी उंचीवरून उडण्याचा सराव करत आहेत.
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
भारत काय करतोय...
पाकिस्तानने तिकडे तयारी सुरु केलेली असताना भारतानेही तयारी सुरु केलेली आहे. हवाई दलाने राजस्थानमध्ये युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामध्ये राफेल लढाऊ विमाने देखील सहभागी झाली आहेत. हवेतून सपाट जमिनीवर तसेच डोंगररागांमध्ये हल्ला करण्याचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. याचे नाव आक्रमण असे ठेवण्यात आले आहे. तसेच भारतीय सैन्याला सीमेवर अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
Movement of #PakistanArmy heavy armoury to the Indo-Pak IB & LoC including tanks, self propelled artillery & heavy weaponry. https://t.co/0mnBlQYUi3pic.twitter.com/dGcpY6V7Ll
— Subcontinental Defender 🛃 (@Anti_Separatist) April 25, 2025