न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचा भारताशी झालेला व्यापार करार ऐतिहासिक असल्याचे वर्णन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या करारामुळे भारत आणि इतर व्यापारी भागीदार देशांना केल्या जाणाऱ्या कोळशाच्या निर्यातीत अमेरिका मोठी वाढ करणार असल्याचे ते म्हणाले.
बुधवारी आयोजित ‘चॅम्पियन ऑफ कोल’ या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका आता ऊर्जा क्षेत्रातील एक मोठा निर्यातदार देश बनत आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेने जपान, कोरिया, भारत आणि इतर देशांसोबत ऐतिहासिक व्यापार करार केले. त्यामुळे अमेरिकेची कोळसा निर्यात वाढणार आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका व भारत यांनी अंतरिम व्यापार कराराचा आराखडा निश्चित केल्याची घोषणा केली होती. करारानुसार, सर्व अमेरिकी औद्योगिक वस्तू, विविध खाद्यपदार्थ आणि कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क भारत रद्द किंवा कमी करण्यावर सहमती झाली होती. भारत पुढील ५ वर्षांत ५०० अब्ज डॉलर किमतीची अमेरिकी उत्पादनांची खरेदी करणार आहे.
कॅनडावरील शुल्काविरोधात धक्कादायक मतदान
कॅनडावर लादलेल्या व्यापार शुल्काला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने नाकारले. बुधवारी २१९ विरुद्ध २११ असे प्रतिनिधीगृहात मतदान होऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे धोरण फेटाळण्यात आले. ट्रम्प यांच्या धोरणांना न जुमानता, स्वपक्षीय खासदारांनीही डेमोक्रॅट्सना साथ दिल्याने ट्रम्प यांच्या अजेंड्याला हा एक धक्का मानला जात आहे. प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण आहे; पण, तेथेच ट्रम्प यांना आव्हान देण्यात आले. हा ठराव आता पुढील मंजुरीसाठी सिनेटमध्ये पाठविण्यात येणार आहे. या करारामुळे अमेरिकेतील कॅनडा समर्थक लॉबीला आणि व्यापार समुदायाला दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Trump hailed a historic trade deal with India, boosting US coal exports. India will buy $500 billion worth of American products in 5 years. US House rejected Trump's Canada tariffs.
Web Summary : ट्रम्प ने भारत के साथ ऐतिहासिक व्यापार समझौते की सराहना की, जिससे अमेरिकी कोयला निर्यात बढ़ेगा। भारत 5 वर्षों में 500 अरब डॉलर के अमेरिकी उत्पाद खरीदेगा। अमेरिकी सदन ने ट्रम्प के कनाडा टैरिफ को खारिज कर दिया।